हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काॅंग्रेसवर टीका

By आनंद डेकाटे | Updated: August 1, 2025 15:01 IST2025-08-01T14:59:40+5:302025-08-01T15:01:15+5:30

Nagpur : युपीएने मताच्या राजकारणासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली

Devised the theory of Hindu terrorism; Chief Minister Devendra Fadnavis criticizes Congress | हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काॅंग्रेसवर टीका

Devised the theory of Hindu terrorism; Chief Minister Devendra Fadnavis criticizes Congress

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
२००८ सालच षडयंत्र आता सर्वांसमोर उघड झालय. त्यावेळच्या युपीए सरकारने मतांच्या राजकारणासाठी हिंदू टेरर, भगवा दहशतवाद हे शब्द तयार केले. हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

वारंगा येथे कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माजी एटीएस अधिकाऱ्याच्या वक्तव्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १९९० च्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारणत: २००० च्या सुरुवातीला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडल्या. अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादाच्या घटना घडल्या. भारतात तर घडतच होत्या. यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते. त्यातून इस्लामिक टेररिजमच नरेटिव तयार झालं. ते भारताने तयार केलं नव्हतं” “भारतात या नरेटिवचा आपल्या वोटबँकेवर परिणाम होतोय हे काँग्रेसच्या लक्षात आलं. कोणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवलं नव्हतं. पण तरीदेखील या ठिकाणी सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं यूपीएने षडयंत्र रचलं. हिंदू दहशतवाद हा शब्द तयार केला. आम्हाला मतदान करणारे जे लोक आहेत, त्यांच्या मनात राग निर्माण होऊ नये किंवा त्यांना वाटावं आम्ही बॅलन्स करतोय, यासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवण्यात आली. लोकांना अटक केली. हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी, पदाधिकारी यांना टार्गेट करण्याचं हे षडयंत्र होतं. त्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांना ठोस पुरावे मिळाले नाही. अनेक अधिकारी असे होते, ज्यांच्यावर भरपूर दबाव टाकण्यात आला. त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही असं बेकायद काम करणार नाही. हे षडयंत्र हळूहळू बाहेर येत असल्याचेही ते म्हणाले.

यापुढे मंत्र्यांचा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही
माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, जी काही घटना घडली त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. चर्चेअंती त्यांच खातं बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु यापुढे मंत्र्यांचे बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. कारवाई होणार असेही त्यांनी स्पष्ट केले.आणखी खातेबदल होणार का? असे विचारले असता याबाबत कुठलीही चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Devised the theory of Hindu terrorism; Chief Minister Devendra Fadnavis criticizes Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.