शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार

By योगेश पांडे | Updated: April 4, 2023 17:03 IST

जो चुकीचे काम करेल त्याला तुरुंगात टाकणार - फडणवीस

नागपूर : शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजिनाम्याची मागणी करताच राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरून फडणवीसदेखील आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अडीच वर्षांच्या काळात ज्यांनी घरी बसून काम केले त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असे नाही. जर आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. फडणवीस मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दोन दोन मंत्री तुरुंगात गेल्यावरदेखील त्यांचा राजिनामा घेण्याची हिंमत ज्यांनी दाखविली नाही, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही. ज्यांच्या काळात पोलीस खंडणीबाज झाले त्यांना बोलण्याचा अधिकारच काय असा सवाल फडणवीस यांनी केला.मी राज्याचा गृहमंत्री असल्याने अनेक लोकांना अडचण होत असून ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मला गृहमंत्रीपद कसे सोडावे लागेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मी कुठल्याही स्थितीत हे पद सोडणार नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असून जो चुकीचे काम करेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही घटनेची निष्पक्ष चौकशी आमचे सरकार करेल. पण त्याचे राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. कुणी चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी नागपुरकर, ठाकरेंहून खालची भाषा येते

त्यांचा जो थयथयाट आहे त्याला उत्तर देण्याचे कारणच नाही. पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून ते निवडून आले व त्यानंतर खुर्चीसाठी लाळघोटेपणा केला. खरा फडतूस कोण हे सर्वांनाच माहिती आहे. मी नागपुरचा आहे. ते ज्या भाषेत बोलले त्याहून खालची भाषा मला येते. पण मी तसा बोलणार नाही. तशी बोलण्याची माझी पद्धत नाही. याचे उत्तर त्यांना जनताच देईल, असेदेखील फडणवीस म्हणाले. चाणक्य म्हणाले होते की ज्यावेळी राज्यातील चोर, डाकू, लुटेरे किंवा अपप्रवृत्तीचे लोक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावे की राजाने योग्य काम सुरू केले आहे. मी राजा नाही, पण तरीदेखील चाणक्य जे म्हणाले ते राज्यात आता खरे होत असल्याचे दिसून येत आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे