शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

देवेंद्र भाऊ, पुन्हा आले ! शपथविधीनंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 23:18 IST

अखेर शनिवारी सकाळी सकाळीच ‘ती’ बातमी मिळाली अन् बहुतांश कार्यकर्त्यांच्या तोंडून निघाले...‘आपले देवेंद्र भाऊ, पुन्हा आलेच’. सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता व एक मोठा तणाव दूर झाल्याचे समाधान चेहऱ्यांवर दिसून येत होते. मग क्या कहने. शहरभरात जल्लोष, आतषबाजी, ढोलताशांचा गजर अन् मिठाईने सर्वांचे तोंड गोड करणे सुरु होते.

ठळक मुद्देशहरात ठिकठिकाणी आतषबाजी, मिठाई वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ते परत येणार...ते परत येणार’ याचा कार्यकर्त्यांना विश्वास होता. परंतु विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर व त्यानंतर दररोज बदलणाऱ्या राजकारणामुळे धडधड वाढली होती. रोज सकाळ ते सायंकाळ कधी ती गोड बातमी येते याचीच प्रतीक्षा सर्वांना होती. अनेकांनी तर ते आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे अक्षरश: नवसच बोलून ठेवला होता. अखेर शनिवारी सकाळी सकाळीच ‘ती’ बातमी मिळाली अन् बहुतांश कार्यकर्त्यांच्या तोंडून निघाले...‘आपले देवेंद्र भाऊ, पुन्हा आलेच’. सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता व एक मोठा तणाव दूर झाल्याचे समाधान चेहऱ्यांवर दिसून येत होते. मग क्या कहने. शहरभरात जल्लोष, आतषबाजी, ढोलताशांचा गजर अन् मिठाईने सर्वांचे तोंड गोड करणे सुरु होते. राज्यासाठी मुख्यमंत्री परंतु आपल्यासाठी ‘भाऊ’च असलेल्याने दिलेले ‘सरप्राईज’ पाहून अनेकांचे आनंदाश्रू थांबत नव्हते.देवेंद्र फडणवीस यांनी सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली व शहरातील भाजपाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्या उत्साहाला उधाण आले होते.. सत्तास्थापनेची नाट्यमय घडामोड घडल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवसभरात शहरातील विविध ठिकाणी जोरदार जल्लोष केला.शहर भाजपातर्फे ‘सेलिब्रेशन’देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता शहर भाजपातर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. टिळक पुतळ्याजवळ महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित आले होते. आ.गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, महापौर संदीप जोशी, शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी ‘सेलिब्रेशन’ केले. यावेळी फटाके फोडण्यात आले तसेच ‘बँड’च्या तालावर कार्यकर्ते अक्षरश: थिरकले. यावेळी माजी महापौर नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, संदीप जाधव,सुभाष पारधी, नंदा जिचकार, भोजराज डुम्बे, जयप्रकाश गुप्ता, चेतना टांक, किशन गावंडे, प्रगती पाटील, राजीव पोतदार, दयाशंकर तिवारी, शिवानी दाणी, महेंद्र राऊत, देवेन दस्तूरे, किशोर पलांदूरकर, प्रभाकर येवले,मनीष मेश्राम,नवनीत तुली, सतीश रिसवान, किशोर पेठे,मनीषा काशीकर, डॉ कीर्तिदा अजमेरा, दिव्या धुरडे, विंकी रुघवानी, प्रताप मोटवानी, गुडडू खान, गजेन्द्र पांडे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.महापौरांच्या उपस्थितीत जल्लोष 

सकाळी ९.३० च्या सुमारास लक्ष्मीनगरच्या महापौर संदीप जोशी यांच्या आठ रस्ता चौकाजवळील निवासस्थानासमोर सकाळीच भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नवनियुक्त महापौर संदीप जोशी हेदेखील जल्लोषात सहभागी झाले होते. आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात अनेकांनी ताल धरला तर महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला.सतरंजीपुऱ्यात आनंदोत्सवपूर्व नागपुरातील सतरंजीपुरा भागामध्ये आमदार कृष्णा खोपडे यांच्या निवासस्थानाजवळ आनंदोत्सवच साजरा करण्यात आला. यावेळी मिठाई वाटून भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, उपमहापौर मनिषा कोठे, मंडळ अध्यक्ष महेंद्र राऊत,नगरसेविका मनिषा धावड़े, कांता रारोकर, मनिषा अतकरे, चेतना टांक, मनोज चापले, दीपक वाडीभस्मे, राजकुमार सेलोकर, संजय महाजन, राजू खोपड़े, रोहित खोपड़े, संजय अवचट, मनोज अग्रवाल, सचिन करारे,अनिल कोडापे, बालू रारोकर, सेतराम सेलोकर, नरेश जुमानी, जे पी शर्मा, मधुसूदन सारड़ा, महेन्द्र कटारिया, संजय वाधवानी, राकेश गांधी, अशोक सनिवारे, श्याम बजाज, संदीप साबू प्रामुख्याने उपस्थित होते.रेशीमबाग चौकात आतषबाजी 
सकाळच्या सुमारास आमदार मोहन मते यांच्या रेशीमबाग येथील कार्यालयासमोर जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी मोहन मते यांनी नागरिकांना मिठाई वाटप केले. शिवाय कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या तालावर फेर धरला.जरीपटक्यात मिठाई वाटपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर वसनशाह चौक, जरीपटका येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करून एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी मनपाच्या आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, मंडळ अध्यक्ष दिलीप गौर, नगरसेविका सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर