शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभावंतांच्या भरवशावरच विदर्भाचा विकास

By admin | Updated: January 7, 2016 03:41 IST

नागपूर-विदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक प्रतिभावंत आहेत. त्यांनी देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्धही केले आहे.

विंग कमांडर अजय गद्रे : सारथीचा पुरस्कार वितरण सोहळा नागपूर : नागपूर-विदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक प्रतिभावंत आहेत. त्यांनी देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्धही केले आहे. पण आपल्या शहरात न मागता आपल्याला सन्मान मिळावा, यासारखा मोठा सन्मान नाही. कुणी तरी आपली दखल घेतो आहे, ही भावना बळ देणारी आहे. सारथी संस्थेने हे कार्य मागील २५ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. अशा प्रतिभावंतांच्या भरवशावरच विदर्भाचा विकास आणि उन्नती शक्य असल्याचे मत विंग कमांडर अजय गद्रे यांनी बुधवारी व्यक्त केले. सारथी संस्थेच्यावतीने नागपूर-विदर्भातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर, सुरेश चांडक, अनिरुद्ध वझलवार, सारथीचे अध्यक्ष मधुकर आपटे, अ‍ॅड. राजेंद्र राठी, एस जी. देशपांडे, प्रशांत काळे उपस्थित होते. गद्रे म्हणाले, प्रतिभावंतांचा सत्कार त्यांच्या कार्यात अधिक उंची गाठण्यासाठी त्यांना ऊर्जा प्रदान करणारा असतो. त्यामुळेच सारथीचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. अर्थशास्त्र, उद्योग, कला, नृत्य, नाट्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांना सारथीच्यावतीने सन्मानित करण्यात येते, ही वेगळी घटना आहे. याप्रसंगी फणशीकर यांनी सारथीच्या २५ वर्षांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात मूर्तिकार श्रीराम इंगळे, जलतरणपटू प्रभाकर साठे, बुद्धिबळपटू स्वप्नील धोपारे, व्यावसायिक ए.के. गांधी, अरुण लखानी, कृषितज्ज्ञ सी.डी. मायी, ज्येष्ठ समाजसेवक आणि नेते अटलबहादूर सिंग यांचा अतिथींच्या हस्ते शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानचिन्हाने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्तींनी सारथीची प्रशंसा करून आपल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. संचालन प्रभा देऊस्कर यांनी तर आभार अ‍ॅड. राजेंद्र राठी यांनी मानले. (प्रतिनिधी)