शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फ्लार्इंग क्लबचा विकास शासनाला उत्तरासाठी वेळ

By admin | Updated: October 10, 2014 00:58 IST

नागपूर फ्लार्इंग क्लबचा विकास करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने गेल्या २३ एप्रिल रोजी राज्य शासनाच्या

नागपूर : नागपूर फ्लार्इंग क्लबचा विकास करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने गेल्या २३ एप्रिल रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, नवी दिल्ली येथील सिव्हिल एव्हिएशनचे महासंचालक, नागपूर विभागीय आयुक्त व एअरो क्लब आॅफ इंडियाचे महासचिव यांना नोटीस बजावून ११ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, अद्याप एकाही प्रतिवादींचे प्रतिज्ञापत्र आलेले नाही. परिणामी न्यायालयाने प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी वेळ देताना सुनावणी दिवाळीच्या सुट्यांनंतर निश्चित केली आहे.श्रीधर माधवराव घटाटे असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते वायुसेनेचे निवृत्त फायटर पायलट व क्लबचे सदस्य आहेत. ही याचिका ८ आॅक्टोबर रोजी सुनावणीसाठी आली होती. १९४८ मध्ये खासगी कंपनी म्हणून नागपूर फ्लार्इंग क्लबची स्थापना झाली होती. खासगी विद्यार्थी, एनसीसी वायुदलाचे विद्यार्थी, वायुसेनेचे जवान यांना क्लबमध्ये प्रशिक्षण देण्यात येत होते. यानंतर शासनाने ३ आॅक्टोबर १९९० क्लबचे व्यवस्थापन व खर्च स्वत:कडे घेऊन विभागीय आयुक्तांची कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्ती केली. परंतु, आवश्यक कर्मचारी व सुविधांच्या अभावामुळे क्लबचे कार्य बरेच दिवस ठप्प राहिले. एक दिवस क्लब बंद पडला. यामुळे घटाटे यांनी २००३ मध्येसुद्धा जनहित याचिका दाखल केली होती. वेळोवेळी दिलेल्या आदेशानंतर क्लब पूर्ण ताकदीने कार्य करायला लागल्यामुळे न्यायालयाने ५ डिसेंबर २००८ रोजी ही याचिका निकाली काढली होती. आज हा क्लब देशात सर्वोत्कृष्ट आहे. यामुळे त्याचा पुढच्या टप्प्यातील विकास करणे आवश्यक आहे. क्लबमधील विमाने जुनी झाली आहे. नवीन मल्टी इंजिन व अतिरिक्त विमाने देण्याची गरज आहे. याशिवायही अनेक सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीनिवास देशपांडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)