नागपुरात घरोघरी जाऊन घेणार कुष्ठरुग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:11 AM2019-08-30T11:11:09+5:302019-08-30T11:14:39+5:30

कुष्ठरुग्ण शोध अभियान येत्या १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

Detection of leprosy patients will go from house to house in Nagpur | नागपुरात घरोघरी जाऊन घेणार कुष्ठरुग्णांचा शोध

नागपुरात घरोघरी जाऊन घेणार कुष्ठरुग्णांचा शोध

Next
ठळक मुद्देप्रत्येक सदस्यांची होणार तपासणी२१६४ पथके तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्रिय कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहिम तसेच असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान येत्या १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन घरामधील सर्व सदस्यांची कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य आजारासाठी शारीरिक तपासणी आशा व स्वयंसेवक यांच्या चमूद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील सर्व घरांचे व शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, ग्रामीण व शहरी भागांमध्ये एकूण २१६४ पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
या अभियानांतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर १० लाख लोकसंख्यमागे एकपेक्षा कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे, क्षयरोगाचे निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे, मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाºया व्यक्तींना शोधणे, संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरू करणे, समाजातील वय वर्ष ३० व अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग या रोगांबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच क्षयरोग, कुष्ठरोग निर्मूलनासाठी व असंसर्गजन्य रोगांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.
सक्रिय कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहिम तसेच असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान-२०१९ अभियानाबाबत समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात घेण्यात आली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्राचे सहायक संचालक डॉ. विजय डोईफोडे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. बी.एस. मडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए.एस.इनामदार, महानगरपालिकेच्या उपसंचालक डॉ. भावना सोनकुसरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे, समन्वयक डॉ. विनोद पाकधुने, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार आदी उपस्थित होते.

Web Title: Detection of leprosy patients will go from house to house in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य