नागपूरच्या सदरमधील हुक्क्याचा ‘ठिकाणा’ उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:32 PM2019-08-08T23:32:52+5:302019-08-08T23:38:58+5:30

पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही बिनबोभाट सुरू असलेले एक हुक्क्याचा ‘ठिकाणा’ पोलिसांनी उद्ध्वस्त केला. तेथून हुक्का पॉट, सुगंधित तंबाखू आणि हुक्क्याचे साहित्य जप्त करून १० जणांना ताब्यात घेतले.

Destruction of Hookka's place at Sadar in Nagpur | नागपूरच्या सदरमधील हुक्क्याचा ‘ठिकाणा’ उध्वस्त

नागपूरच्या सदरमधील हुक्क्याचा ‘ठिकाणा’ उध्वस्त

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस उपायुक्त साहू यांच्या पथकाचा छापामालक, व्यवस्थापकासह १० जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही बिनबोभाट सुरू असलेले एक हुक्क्याचा ‘ठिकाणा’ पोलिसांनी उद्ध्वस्त केला. तेथून हुक्का पॉट, सुगंधित तंबाखू आणि हुक्क्याचे साहित्य जप्त करून १० जणांना ताब्यात घेतले. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ही कारवाई केली.
हुक्का पार्लरला राज्यभरात बंदी घालण्यात आल्यानंतर उपराजधानीतील अनेक हुक्का पार्लर चालकांनी आपला गाशा गुंडाळला. मात्र, निर्ढावलेल्या काही जणांनी ठिकठिकाणच्या हप्तेखोरांना हाताशी धरून हुक्का पार्लर सुरूच ठेवले आहेत. सदरमधील लिंक रोडवर एका चर्चित रेस्टॉरंटच्या बाजूला अशाच प्रकारे ‘ठिकाणा हुक्का पार्लर’ चालविले जात होते. ही माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या पथकाला मिळाली. शहानिशा केल्यानंतर गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी ‘ठिकाणा पार्लर’मध्ये अनेक तरुण-तरुणी हुक्क्याचा धूर उडविताना दिसले. पोलिसांचा छापा पडताच तेथे धावपळ निर्माण झाली. पोलिसांनी १० तरुणांना तेथून ताब्यात घेतले. त्यात पार्लरचा मालक आणि व्यवस्थापकाचाही समावेश आहे. त्यातील एकाचे नाव शुभम असून, त्यांच्या नावाची आणि वयाची शहानिशा केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी लोकमतशी बोलताना दिली. तेथून पोलिसांनी हुक्का पॉट, सुगंधित तंबाखूसह लाखोंचे साहित्य जप्त केले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती.

Web Title: Destruction of Hookka's place at Sadar in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.