शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव

By admin | Updated: September 15, 2014 01:03 IST

श्रवणीय संगीत, तालबद्ध पदन्यास, शिस्तबद्ध नियोजन अन् अप्रतिम अभिनयाचा संगम. कधी दिसणारा श्रीकृष्णाचा खट्याळपणा, तर कधी उमटणारा सुभद्रेचा हट्ट. श्रीकृष्ण आणि सुभद्रा यांच्यातील

‘श्री श्री पर्व’मध्ये रंगली नृत्यनाटिका : सांदिपनीच्या विद्यार्थ्यांनी रसिकांना केले मंत्रमुग्धनागपूर : श्रवणीय संगीत, तालबद्ध पदन्यास, शिस्तबद्ध नियोजन अन् अप्रतिम अभिनयाचा संगम. कधी दिसणारा श्रीकृष्णाचा खट्याळपणा, तर कधी उमटणारा सुभद्रेचा हट्ट. श्रीकृष्ण आणि सुभद्रा यांच्यातील बहीण भावामधील प्रेमळ बंधाची क्षणाक्षणाला मिळणारी उत्कट अनुभूती. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात रंगलेल्या ‘श्री श्री पर्व’ या कार्यक्रमादरम्यान सांदीपनी शाळेच्या हजारीपहाड शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘त्ममेव बंधुश्च सखा त्वमेव’ ही नृत्यनाटिका अत्यंत सुरेखपणे सादर करीत ‘हाऊसफुल्ल’ सभागृहात उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.सांदीपनी शाळेचे संस्थापक डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त ‘श्री श्री पर्व’ हा वार्षिकोत्सव आयोजित करण्यात आला होता. डॉ.जिचकार यांचे आदर्श असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आधारित या कलाकृतीची निर्मिती सांदीपनी परिवारातर्फे करण्यात आली. श्रीकृष्ण आणि सुभद्रा यांच्या आयुष्यातील निरनिराळे भावुक प्रसंग यावेळी नृत्यनाटिकेच्या माध्यमातून मांडण्यात आले. सुभद्रेच्या जन्मापासून ते तिच्या अर्जुनाशी विवाहापर्यंतचे विविध प्रसंग अतिशय कल्पकतेने या नृत्यनाटिकेत गुंफण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनीच सादर केलेल्या या नाटिकेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे माजी प्रमुख डॉ.विनोद इंदूरकर यांची या नृत्यनाटिकेला विशेष उपस्थिती होती. शाळेच्या अध्यक्षा राजश्री श्रीकांत जिचकार यांनी या कार्यक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती देतानाच शाळेच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचादेखील सत्कार करण्यात आला.नृत्यनाटिकेची संकल्पना, पटकथा, दिग्दर्शन, गीत, लेखन इत्यादी प्रकारच्या जबाबदाऱ्या शिक्षकांनीच पार पाडल्या. शाळेच्या प्रमुख सल्लागार लता थेरगावकर, व्यवस्थापिका मृणालिनी काळे, मुख्याधापिका भारती बिजवे, शांती मेनन तसेच उपमुख्याध्यापिका मिस मल्का फैजुद्दिन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.(प्रतिनिधी)