शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दीपक बजाजला सर्वोच्च न्यायालयातही दणका

By admin | Updated: November 3, 2015 03:20 IST

भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमविणारा जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा

नागपूर : भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमविणारा जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाजला सर्वोच्च न्यायालयातही दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी बजाजला अटकपूर्व जामीन नाकारून १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जरीपटका पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत.सुरुवातीला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी बजाजचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १४ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनीही त्याला दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बजाजने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. बजाज हा पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून विविध शुल्क वसूल करीत होता. त्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची नोकरी देण्याकरिता लाखो रुपये घेतले आहेत. यामुळे २४ सप्टेंबर २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बजाजचे निवासस्थान, शाळा, कार्यालय व इतर ठिकाणी धाड टाकली. दरम्यान, अधिकाऱ्यांना १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख व २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किंमतीचे घरगुती सामान अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किंमतीची मालमत्ता आढळून आली. पथकाने २९ सप्टेंबर रोजी सोसायटीचे कार्यालय व सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाची झडती घेतली असता गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली. २६ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलिसांनी बजाजविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३ (२),१३ (१)(ड) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी