शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा शुल्क कमी करा

By admin | Updated: July 1, 2015 03:05 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात इतर विद्यापीठांच्या तुलनेत जास्त परीक्षा शुल्क आकारण्यात येते.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात इतर विद्यापीठांच्या तुलनेत जास्त परीक्षा शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी छात्र युवा संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. आपल्या विविध मागण्यांसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठावर धडक दिली व प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. कुलगुरूंना कार्यकर्त्यांनी निवेदनदेखील दिले.विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. निकाल उशिरा लागले तर प्रवेशदेखील उशिराच होतात. याचा परिणाम ‘अ‍ॅकेडमिक कॅलेंडर’वर होतो व अनेकदा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कदेखील भरावे लागते. शिवाय परीक्षा शुल्कामुळे सामान्य व गरीब विद्यार्थ्यांच्या खिशाला फटका बसतो. त्यामुळे निकाल लवकर लावण्यात यावे व परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. जर कुलगुरू निकाल लवकर लावण्यात अपयशी ठरले तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी संतप्त प्रतिक्रियादेखील कार्यकर्त्यांनी दिली.निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू असून परीक्षा शुल्काचा मुद्दा प्राधिकरणांसमोर मांडावा लागेल असे कुलगुरूंनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पीयूष आकरे, कारण शाहू, शरद आकरे, फैझ अन्सारी, धीरज अगासे, प्रभात अग्रवाल, प्रतीक नीरे, सुयोग वानखडे, लोकेश शाहू, असित अन्सारी, प्रिया अहुजा, सोनू फटिंग, हेमंत, प्रियांका आकरे, राजेश शेवळे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)