शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचा निर्णय असंवैधानिक

By admin | Updated: June 27, 2014 00:36 IST

राज्यात आजपर्यंत १७ मुख्यमंत्र्यांपैकी ११ मुख्यमंत्री व शेकडो मंत्री मराठा समाजाचे झाले आहेत. त्यामुळे सरकारची सर्व धोरणे, नीती, कायदे, प्रकल्प या सर्वांच्या निर्णयावर मराठा समाजाची अधिसत्ता

ओ.बी.सी. मुक्ती मोर्चाचा आरोप : निर्णयाविरोधात न्यायालयात जाणारनागपूर : राज्यात आजपर्यंत १७ मुख्यमंत्र्यांपैकी ११ मुख्यमंत्री व शेकडो मंत्री मराठा समाजाचे झाले आहेत. त्यामुळे सरकारची सर्व धोरणे, नीती, कायदे, प्रकल्प या सर्वांच्या निर्णयावर मराठा समाजाची अधिसत्ता राहिली आहे. सर्वच क्षेत्रात एकाधिकार असलेला मराठा समाज हा कुठल्याच क्षेत्रात मागास नाही. संविधानानुसार जातीच्या आधारावर आरक्षण देता येत नसतानाही, सरकारने कुठलाही आधार, निकष व संवैधानिक प्रक्रिया पूर्ण न करता आरक्षणाचा निर्णय घेतला असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी पत्रपरिषदेत केला. आरक्षणाचे जनक मानले जाणारे छत्रपती शाहू महाराज यांनी ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या निकषाकडे सरकारने दुर्लक्ष करून, असंवैधानिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अन्य प्रवर्गातील जातींनासुद्धा आरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार मिळाला आहे. असे झाल्यास, आरक्षणाच्या नावावर राज्यात अराजकता माजेल असेही ते म्हणाले. मुस्लीम समाजाला सरकारने धर्माच्या आधारावर ५ टक्के आरक्षण दिले आहे.मात्र मुस्लीम समाजातील ३७ जाती या ओबीसीमध्ये येतात. त्यामुळे ओबीसी आणि मुस्लिमांचेही आरक्षणाचा लाभ त्यांना मिळेल. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्या आधारावर, कशाच्या निकषावर दिले आहे, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा न्यायालयात दाद मागणार आहे.यासाठी नगरसेवक परिणय फुके व अ‍ॅड. भूपेश पाटील यांच्या नेतृत्वात कमिटी तयार करण्यात आली आहे. सरकारचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर मुक्ती मोर्चा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्याचबरोबर ओबीसी अन्यायविरोधी अभियान राबविणार असून, ७ आॅगस्ट रोजी ओबीसी अन्यायविरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या पत्रपरिषदेला अ‍ॅड. अशोक यावले, प्रा. रमेश कोलते, नारायण चिंचोणे, भूषण दडवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)