शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पात्र कुलगुरू नियुक्तीचा आज फैसला

By admin | Updated: October 8, 2014 00:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पात्र कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या याचिकेवर उद्या, बुधवारी फैसला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई

हायकोर्ट : न्यायमूर्तीद्वय गवई व देशपांडे देणार निर्णयनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पात्र कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या याचिकेवर उद्या, बुधवारी फैसला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे हे सकाळी १०.३० वाजता या बहुचर्चित प्रकरणावर निर्णय देणार आहेत. सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. यासंदर्भात सिनेट सदस्य गुरुदास कांबडी यांनी रिट याचिका दाखल केली आहे. विद्यापीठात लवकरात लवकर पात्र कुलगुरूची नियुक्ती करण्यात यावी व प्रभारी कुलगुरू नियुक्तीचा अधिकार कुलपतींना देणाऱ्या कलमाचा अन्वयार्थ लावण्यात यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे. प्रा. सुनील मिश्रा यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर कुलपतींनी गेल्या ३० मार्चच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे कुलगुरूचा अतिरिक्त पदभार सोपविला. कुलगुरू विद्यापीठाच्या सर्व वैधानिक मंडळे व निवड समितीचे प्रमुख असतात. यामुळे अशा पदांवर पात्र व्यक्तीचीच नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.कायद्यातील तरतुदी स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली होती. सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी कुलपतींतर्फे बाजू मांडताना महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात प्रभारी कुलगुरूपदी सुयोग्य व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी तरतूद असल्याचे सांगितले होते. कुलगुरूपदासाठी अनेक जण पात्र असू शकतात; पण त्यातून एका सुयोग्य व्यक्तीची नियुक्ती करावी लागते. मृत्यू, नैसर्गिक संकट, अचानक पदाचा राजीनामा देणे अशाप्रकारच्या कठीण परिस्थितीत पात्र कुलगुरूचा शोध घेण्यात वेळ घालविणे अशक्य आहे. यामुळे विशिष्ट कालावधीसाठी विद्यापीठाचा कारभार हाकण्याची क्षमता असलेल्या सुयोग्य व्यक्तीची प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करणे अवैध नाही, असे ते म्हणाले होते. २०१० मध्ये कायद्यात दुरुस्ती करून प्रभारी कुलगुरूचा कार्यकाळ सहा महिन्यांवरून वाढवून एक वर्ष करण्यात आला आहे. तत्पूर्वी २००९ मध्ये कुलगुरूच्या पात्रता निकषांचा कायद्यात समावेश करण्यात आला. त्याआधी कुलगुरूसाठी केवळ सुयोग्यता तपासली जात होती. सुयोग्यता मुख्य निकष असून तो पूर्वीही होता व आताही आहे, याकडे अ‍ॅड. भांगडे यांनी लक्ष वेधले होते. आता न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)