शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नागपुरात दारू विक्रेत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:07 AM

अवैध दारू विक्री करणाऱ्या गुंडाने बेदम मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या करण राजकुमार मेहरा (वय १९, रा. जीजामातानगर, खरबी) याचा अखेर मृत्यू झाला. यानंतर तणाव वाढल्याने आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी कुख्यात गुंड काल्या ऊर्फ शामराव सखाराम गडेरिया (वय ४५) याला अटक केली.

ठळक मुद्देखरबीत तणाव : कुख्यात काल्याला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध दारू विक्री करणाऱ्या गुंडाने बेदम मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या करण राजकुमार मेहरा (वय १९, रा. जीजामातानगर, खरबी) याचा अखेर मृत्यू झाला. यानंतर तणाव वाढल्याने आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी कुख्यात गुंड काल्या ऊर्फ शामराव सखाराम गडेरिया (वय ४५) याला अटक केली.करण आणि काल्या आजूबाजूला राहायचे. काल्या अनेक वर्षांपासून दारू विक्री आणि तस्करीत सहभागी आहे. त्याची या भागात मोठी दहशत आहे. ११ मेच्या सायंकाळी ६.३० वाजता करणची आई नीलम घराला टिन लावत होती. काल्याने त्याला विरोध करून नीलम तसेच परिवारातील सदस्यांना मारहाण केली. जीवे मारण्याचीही धमकी दिली. नीलम यांनी १०० नंबरवर फोन करून या घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षाने नंदनवन पोलिसांना कळविले. नंदनवन पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा काल्या पळून गेला. पोलीस जाताच तो घरी परतला आणि त्याने पुन्हा नीलम यांना शिवीगाळ केली. नीलम यांनी दिलेल्या माहितीवरून पुन्हा पोलीस पोहचले. मात्र, माहिती पडल्यासारखा काल्या आधीच तेथून सटकला. रात्री १०.३० वाजता काल्या पुन्हा घरी आला. त्याने अश्लील शिवीगाळ सुरू केल्याने करणने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काल्याने लाकडी बल्लीने करणवर हल्ला चढवून त्याला बेदम मारहाण केली. काल्याचा मुलगाही त्यात सहभागी झाला. गंभीर जखमी झालेल्या करणला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. नंदनवन पोलिसांनी काल्यावर जुजबी गुन्हा दाखल केल्याने त्याला जामीन मिळाला. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना बुधवारी करणला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावर बुधवारी रात्री या प्रकरणात पोलिसांची ढिलाई चर्चेला आली. परिणामी धावपळ करून नंदनवन पोलिसांनी काल्याला हत्येच्या आरोपात अटक केली. त्याच्या अल्पवयीन दोषी मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांमुळेच गुन्हाकरण एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. तो होतकरू होता. घटनेपूर्वी करणच्या आईने वारंवार नियंत्रण कक्ष आणि नंदनवन पोलिसांना काल्याच्या कुकृत्याची माहिती कळविली. पोलिसांनी दिखाव्यासाठी दोनदा धावही घेतली, मात्र काल्याच्या मुसक्या बांधल्या नाही. वेळीच काल्याला जेरबंद केले असते तर करणचा जीव वाचला असता. विशेष म्हणजे, काल्यावर दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. नंदनवन ठाण्यातील काही पोलिसांसोबत त्याचे मधूर संबंध आहेत. त्याचमुळे काल्या निर्ढावला आहे. त्याने क्षुल्लक कारणावरून करणचा बळी घेतला. या प्रकरणात काल्याचे हित जपणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून