उधारीच्या बीअरसाठी जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST2021-02-08T04:07:41+5:302021-02-08T04:07:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उधारीवर दारू न दिल्यामुळे संतापलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने बीअर शॉपीच्या व्यवस्थापवकावर जीवघेणा हल्ला केला. ...

Deadly attack for borrowed beer | उधारीच्या बीअरसाठी जीवघेणा हल्ला

उधारीच्या बीअरसाठी जीवघेणा हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उधारीवर दारू न दिल्यामुळे संतापलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने बीअर शॉपीच्या व्यवस्थापवकावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारी सायंकाळी हुडकेश्वरच्या मानेवाडा रोडवर घडली. पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह पाच आरोपींना अटक केली.

रणधीर राजू मानेकर, हर्षराज राजू मानेकर, रा.रघुजीनगर पोलीस क्वॉर्टर सुमित राजू चव्हाण, चेतक महेंद्र मून आणि पीयूष राऊत अशी आरोपीची नावे आहे. त्यांचा साथीदार अंशुल गभणे हा फरार आहे.

मानेकर बंधूचे वडील शहर पोलिसात एएसआय आहे. मानेवाडा रोडवर सेवन स्टार बीअर शॉपी आहे. तिथे आशिष आचार्य व्यवस्थापक आहे. दोन दिवसापूर्वी मानेकर बंधुूनी आशिषला उधारीवर बीअर मागितली होती. परंतु त्याने नकार दिल्याने ते आशिषशी वाद घालू लागले. पोलिसांची मुले असल्याने त्यावेळी आशिषने त्याना बीअर दिली. शनिवारी सायंकाळी मानेकर बंधू पुन्हा उधारीवर बीअर घेण्यासाठी आले. आशिषने त्यांना उधारीवर बीअर देण्यास नकार देत पैसे मागितले. यामुळे ते आशिषशी वाद गालू लागले. त्यांनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी आशिषला मारहाण केली. त्याच्या डोक्यावर बीअरच्या बॉटलने वार करीत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाद्वारे गुंडागर्दी झाल्याने पोलीस हादरले. त्यांनी तातडीने कारवाई केली. खुनाचा प्रयत्न व दंग्याचा गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली. आशिषने दोन दिवसापूर्वी झालेल्या वादाची पोलिसात तक्रार केली नव्हती.

Web Title: Deadly attack for borrowed beer