शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

दर्डा संगीत अकादमीने दिले कलावंतांच्या प्रतिभांना पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:57 PM

शास्त्रीय संगीत हा संगीत कलेचा पाया आहे व त्यातूनच सशक्त कलावंत घडविला जाऊ शकतो. त्यामुळे मुलांमध्ये शास्त्रीय संगीत रुजावे, हा उद्देश ठेवून सुरू झालेल्या जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीने खऱ्या अर्थाने कलावंतांच्या प्रतिभांना पंख दिले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्पर्धा, टीव्ही शो व पार्श्वगायनात अकादमीच्या विद्यार्थ्यांचा ठसा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शास्त्रीय संगीत हा संगीत कलेचा पाया आहे व त्यातूनच सशक्त कलावंत घडविला जाऊ शकतो. त्यामुळे मुलांमध्ये शास्त्रीय संगीत रुजावे, हा उद्देश ठेवून सुरू झालेल्या जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीने खऱ्या अर्थाने कलावंतांच्या प्रतिभांना पंख दिले आहे.लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा या स्वत: संगीत साधक, उत्कृष्ट व्हायोलिन वादक आणि गायक होत्या. शास्त्रीय संगीताचे महत्त्व त्यांना ज्ञात होते. त्यामुळे लहान मुलांनी शास्त्रीय संगीत अभ्यासावे हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून २००५ साली दर्डा संगीत अकादमीची रुजवात केली होती. तेव्हापासून या अकादमीने उत्तमोत्तम कलावंत घडविले आहेत. दर्डा अकादमी अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे मान्यताप्राप्त केंद्र असून, मंडळाच्या संगीतविषयक सर्व परीक्षा येथे घेतल्या जातात. अकादमीच्या प्रतिभावंत मार्गदर्शिका डॉ. शमा वाखारकर या स्वत: संगीत विशारद असून, बडोद्याहून त्यांनी संगीत विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. शास्त्रीय संगीताचे शिक्षण आणि सुगम संगीताचे उत्तम मार्गदर्शन हे या अकादमीचे वैशिष्ट्य आहे. डॉ. शमा यांच्या सक्षम मार्गदर्शनात मुलांच्या संगीत कौशल्याला आकार मिळाला आहे. अकादमीच्या अनेक कलावंतांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये क्रमांक प्राप्त केला आहे. अंताक्षरी स्पर्धा तसेच टीव्हीवरील विविध रिअ‍ॅलिटी शोजमध्ये स्वत:च्या प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. एवढेच नाही तर पार्श्वगायनाच्या क्षेत्रातही अकादमीचे अनेक कलावंत नावरूपास येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिभा घडविणारी ही शहरातील एकमेव अकादमी आहे. त्यामुळे मुलांच्या प्रतिभांना ओळख देणारी संस्था म्हणून दर्डा संगीत अकादमीने स्थान निर्माण केले आहे.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाmusicसंगीत