नागपुरात सिलिंडर लिकेजमुळे आई-मुलीसह तिघे भाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:37 IST2019-10-31T00:36:34+5:302019-10-31T00:37:33+5:30
सिलिंडर लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत महिला आणि तिच्या मुलीसह तीन जण भाजल्याची घटना बुधवारी सकाळी लालगंजच्या मेहंदीबागमध्ये घडली.

नागपुरात सिलिंडर लिकेजमुळे आई-मुलीसह तिघे भाजले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिलिंडर लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत महिला आणि तिच्या मुलीसह तीन जण भाजल्याची घटना बुधवारी सकाळी लालगंजच्या मेहंदीबागमध्ये घडली. चित्रा वाकोडीकर (३१), मुलगी स्नेहल वाकोडीकर (१२) आणि रुपमती पराते (१८) असे या घटनेत भाजलेल्यांची नावे आहेत. मेहंदीबागमध्ये अरुण पराते यांचे घर आहे. चित्रा अरुणची बहीण आहे. ती भाऊबीजेसाठी अरुणच्या घरी आली होती. सकाळी ११.१५ वाजता अरुणच्या घरी महिला स्वयंपाक करीत होत्या. दरम्यान सिलिंडर लिकेज झाल्यामुळे स्वयंपाक घरात आग लागली. त्यात चित्रा, तिची मुलगी स्नेहल आणि रुपमती पराते भाजल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.