शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सायकल घोटाळा पूर्वनियोजित!

By admin | Updated: July 7, 2015 02:19 IST

राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागातील २०६ कोटींचे साहित्य व चिक्की खरेदीचा घोटाळा डोळ्यापुढे ठेवून...

कसे येणार अच्छे दिन : गरीब मुलांच्या हक्कावर जि.प.चा डल्लानागपूर : राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागातील २०६ कोटींचे साहित्य व चिक्की खरेदीचा घोटाळा डोळ्यापुढे ठेवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सायकल खरेदीत पूर्वनियोजित घोटाळा केला आहे. गरिब मुलांच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा प्रकार आहे. पैसे खाण्यासाठी गरीब मुलांच्या सायकली कमी पडत असेल तर सर्वसामान्यांना अच्छे दिन कसे येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागामार्फ त विद्यार्थ्यांना एक कोटीच्या सायकली वाटप करण्यात येणार आहेत. याची पदाधिकाऱ्यांना आधीच जाणीव होती. त्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पातच एक कोटीच्या सायकलींचे दोन तुकडे पाडले. याचा आधार घेत एकाच साहित्याचे दोन कंत्राट देण्याची चलाखी केली.तीन लाखांपेक्षा अधिक खरेदी असल्यास ई-निविदा काढण्यात याव्यात, असे संकेत असतानाही शिक्षण विभागाला याची गरज भासली नाही. विशेष म्हणजे हा निर्णय घेताना शिक्षण समितीच्या सदस्यांना अंधारात ठेवून तहकूब सभेत घाईघाईत या विषयाला मंजुरी देण्यात आली. वास्तविक जि.प.चा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर करण्यात आला होता. यात सायकल वाटपासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रीतसर निविदा काढता आल्या असत्या. परंतु यात स्पर्धा होईल; आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट मिळणार नाही, याची जाणीव असल्याने सायकल खरेदीच्या निविदा मागविण्यात आलेल्या नाही. शिक्षण समितीच्या काही सदस्यांनी सभेत हा मुद्दाही उपस्थित केला होता, परंतु याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले.(प्रतिनिधी)अनियमितता नाहीसायकल खरेदीची प्रक्रिया नियमानुसारच करण्यात आली आहे. शासनाचे दरकरार असल्याने यात निविदा काढण्याची गरज नाही. चांगल्या दर्जाच्या सायकलचा पुरवठा केला जाणार आहे. यात अनियमितता झालेली नाही.निशा सावरकर, अध्यक्ष, जि.प.सॅम्पल बघायलाच हवेपक्षाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. सायकल खरेदी करताना शिक्षण समितीने सॅम्पल बघायला पाहिजे. प्रचलित पद्धतीनुसार खरेदी होईल असे वाटले होते. परंतु याला फाटा देण्यात आला. कोणतीही प्रक्रिया नियमानुसार व्हायला हवी.विजय देशमुख, सत्तापक्ष नेता, जि.प.प्रमाणपत्रानंतर बिल देणारकंत्राटदाराने शासकीय दरकरारातील अटी व शर्तीनुसार सायकलचा पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यानुसार आहे की नाही, यासाठी साहित्य शासकीय इन्स्टिट्यूटकडे तपासण्यासाठी पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून मालाचा दर्जा चांगला असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराला बिल देण्यात येईल. शिवाजी जोंधळेमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पूर्वनियोजित भ्रष्टाचारएकाच साहित्याची तुकडे पाडून खरेदी करता येत नाही. याची जाणीव असल्याने शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पात एक कोटीच्या सायकल खरेदीसाठी प्रत्येकी ५०-५० लाखाची तरतूद केली. तहकू ब सभेत याला मंजुरी देण्यात आली. ई-टेंडरची गरज भासली नाही. यात शंभर टक्के भ्रष्टाचार झाला आहे. याचा सत्ताधाऱ्यांना जाब विचारू.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि.प.नियमबाह्य कामाला सेनेचा विरोधसायकल खरेदी करताना मुख्यालयात सॅम्पल ठेवण्याची प्रथा होती. परंतु यावेळी सॅम्पल न बघताच कंत्राट देण्यात आले. नियमबाह्य कामाला आमचा विरोध आहे. कोणत्याही साहित्याची खरेदी करताना त्यात पारदर्शकता असायलाच हवी.शरद डोणेकर, उपाध्यक्ष,जि.प.