शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेल कोट्यात कपात

By admin | Updated: January 29, 2015 01:01 IST

‘अच्छे दिन’ येणार म्हणून गोरगरीब जनता आस लावून बसली असतानाच रॉकेलच्या जानेवारी महिन्याच्या कोट्यात कपात करून सरकारने त्यांची झोप उडविली आहे.

फक्त एक लिटरचे वाटप : गोरगरीब चिंतितमुस्तफा मुनीर - नागपूर ‘अच्छे दिन’ येणार म्हणून गोरगरीब जनता आस लावून बसली असतानाच रॉकेलच्या जानेवारी महिन्याच्या कोट्यात कपात करून सरकारने त्यांची झोप उडविली आहे.कपातीचे कारणपुढे करीत रेशन दुकानदार ग्राहकांना फक्त एक लिटरचेच वाटप करीत आहे. त्यामुळे गरीब जनता चिंतित आहे.. बीपीएल कार्डधारक धीरज कुरील यांनी सांगितले की, अनेक दिवस रेशन दुकानात गेल्यानंतर आता रॉकेल मिळाले. या महिन्याच्या अखेरीस रॉकेलाचा पूर्ण कोटा प्राप्त होईल व पाच लिटर रॉकेल मिळेल, असे दुकानचालक सांगत होते. पण शेवटी सरकारी आदेशाचा हवाला देत फक्त एक लिटर रॉकेल देण्यात आले.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना त्या तुलनेत पेट्रोल आणि रॉकेलच्या किमती कमी करण्याऐवजी सरकार गरिबांच्या रॉकेल कोट्यातच कपात करीत असल्याने नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. यासंदर्भात एका रेशन दुकान चालकाला विचारले असता त्यांनी सांगितले की, या महिन्याच्या कोट्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कपात होईल याची पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे सुरुवातीपासून ग्राहकांना निश्चित प्रमाणानुसार रॉकेलचे वाटप करण्यात आले. पण अचानक १७ जानेवारीनंतर कोटा कमी करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आणि नियोजनही बिघडले.प्राप्त माहितीनुसार जानेवारीच्या सुरुवातीपासूनच पुरवठा विभागाकडून वितरकांना कमी रॉकेल दिले जात होते. पण अधिकाऱ्यांपासून तर वितरकांपर्यंत आणि दुकानदारांपर्यत सर्वांना जानेवारीच्या अखेरपर्यंत कोटा वाढवून मिळेल, असा अंदाज होता. पण तो फोल ठरला.दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश वंजारी यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी रॉकेल कोट्यात ६६ टक्के कपात करण्यात आल्याचे सांगितले. ही कपात फक्त जानेवारी महिन्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात ही कपात ७८ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)