शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
3
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
4
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
5
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
6
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
7
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
8
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
9
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
10
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
11
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
12
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
13
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
14
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
15
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
16
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
17
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
18
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
19
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
Daily Top 2Weekly Top 5

सेवेबाबत ग्राहकांनी दक्ष असावे

By admin | Updated: January 23, 2015 02:49 IST

कंपन्यांकडून मिळणाऱ्या आवश्यक सेवेसंदर्भात ग्राहकांनी दक्ष असावे, असे आवाहन टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅॅथॉरिटी आॅफ इंडियाचे (ट्राय) कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र ....

नागपूर : कंपन्यांकडून मिळणाऱ्या आवश्यक सेवेसंदर्भात ग्राहकांनी दक्ष असावे, असे आवाहन टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅॅथॉरिटी आॅफ इंडियाचे (ट्राय) कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र क्षेत्राचे सल्लागार प्रमुख डॉ. सिबीचेन के. मॅथ्यू यांनी येथे केले.
ट्रायच्या बेंगळुरू कार्यालयातर्फे अधिकारांची माहिती नागरिकांना देण्यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी ग्राहक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. मॅथ्यू यांनी क्षेत्रीय कार्यालयाची भूमिका, कार्यपद्धती तसेच दूरध्वनी ग्राहक संरक्षणासंदर्भात आतापर्यंत घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. दूरध्वनीसंबंधित मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी, अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन, मूल्यधारित सेवा, तक्रार नोंद कार्यपद्धती, टेरिफ आदींबद्दल ट्रायच्या नियमांवर प्रकाश टाकण्यात आला.
टेरिफ प्लॅन सहा महिने बंधनकारक
दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपनांना आपला टेरिफ प्लॅन दोन प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून आणणे बंधनकारक आहे. यातील एक वर्तमानपत्र इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषेचा असावा. एखादा नवीन टेरिफ प्लॅन कमीत कमी सहा महिने पुरविणे बंधनकारक आहे. फोन सेवेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याबाबत काही नियम जाहीर केले आहेत. त्यामध्ये प्रीपेड सेवेत ९० दिवसांपेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करू शकत नाही. ग्राहकाच्या फोन खात्याात कमीत कमी २० किंवा त्यातून अधिक जमा असल्यास ही सेवा बंद करता येणार नाही.
मोबाईल डिस्कनेक्ट झाल्यावर पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी १५ दिवसांचा अधिक कालावधी देण्यात यावा. दूरध्वनी सेवेप्रमाणेच केबल टीव्ही नेटवर्कच्या डिजिटलायझेशन संदर्भात माहिती देण्यात आली. केबल आॅपरेटर्सकडे सेवेसंदर्भात तक्रार निवारण व्यवस्था असणे बंधनकारक आहे.
यावेळी कन्झ्युमर्स हॅण्डबुकचे उपस्थितांना वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात बेंगळुरू क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर, अधिकारी, संस्थांचे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सदस्य, स्वयंसेवा संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)