शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत युवतीला दिले कुटुंबीयांच्या ताब्यात

By admin | Updated: January 8, 2017 02:52 IST

पळून गेलेल्या महिला व मुलीचा शोध नाही!

अकोला, दि. ७- नागपूरमधील मोमीनपुरा येथील एका खासगी रुग्णालयात कामावर असलेल्या युवतीला प्रेमाच्या जाळय़ात ओढून तिचे बुरखाधारी महिलेच्या साहाय्याने नागपुरातून अपहरण केल्यानंतर सदर युवतीची शुक्रवारी सुटका करण्यात आली. त्यानंतर शनिवारी जीआरपी पोलिसांनी सदर युवतीस तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात शुक्रवारी शेगाव रेल्वेस्थानकावरून पळून गेलेली बुरखाधारी महिला आणि तिच्यासोबतची जखमी अवस्थेत असलेल्या मुलीचा पोलिसांनी शोधच घेतला नसल्याची माहिती आहे.नागपूर येथील रहिवासी २१ वर्षीय युवती नागपूरमधीलच मोमीनपुरा येथील रहिवासी डॉ. खान यांच्या हॉस्पिटलमध्ये कामावर आहे. या युवतीला दीपक नामक युवकाने प्रेमाच्या जाळय़ात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर सदर युवतीला गुंगीचे औषध देऊन एका बुरखाधारी महिलेच्या साहाय्याने तिचे अपहरण केले होते. या प्रकरणाची तक्रार नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली; मात्र त्यानंतर सदर युवतीला एक बुरखा घालून शेगाव रेल्वे स्टेशनवरून हैदराबाद येथे नेण्यात येत असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तिची शुक्रवारी रात्री सुटका करण्यात आली. त्यानंतर सदर युवतीला जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये ठेवून शनिवारी पहाटे तिला आई, जावई आणि भावाच्या ताब्यात दिले; मात्र या प्रकरणातील अपहरण करणारी आणि शेगाव रेल्वेस्थानकावरून पळून गेलेली बुरखाधारी महिला आणि तिच्यासोबत असलेली चिमुकली मुलगी यांचा कोणताही शोध शेगाव जीआरपीने घेतला नाही. त्यामुळे सदर गंभीर प्रकरणामध्ये पोलिसांनी कोणतेही गांभीर्य बाळगले नसल्याचे वास्तव आहे.