शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक महामंडळे बनली राजकीय आखाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST

- साहित्य, नाटक, चित्रपट : पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी - नाट्य परिषदेत होणार उलथापालथ प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

- साहित्य, नाटक, चित्रपट : पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

- नाट्य परिषदेत होणार उलथापालथ

प्रवीण खापरे /

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मूळ हेतू बाजूला सारून राज्यातील सांस्कृतिक महामंडळांमध्ये राजकीय आखाडे रंगायला लागले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चित्रपट महामंडळ आणि मराठी साहित्य महामंडळांच्या कारभारावरून हे स्पष्ट होत आहे. कला, साहित्य, संस्कृतीचे रक्षण, संवर्धन आणि विकास या मुख्य मुद्द्‌यांकडे सारासार दुर्लक्ष करून ही महामंडळे पक्षोपपक्षीय राजकारणाच्या अड्ड्यांसोबतच द्वेष-मत्सराने परिपूर्ण बनली असल्याने, त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

नाट्य परिषद, चित्रपट महामंडळ आणि साहित्य परिषदेचा विचार केला, तर या संस्थांना वार्षिक शासकीय पाठबळ असते आणि याद्वारे आणि देशोदेशी मराठी कला, साहित्य व संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासोबतच विकासाचेही संवैधानिक अधिकार आहेत. केवळ शासकीय पाठबळच नव्हे, तर वेगवेगळ्या ठिकाणी संघटन मजबूत करून त्या भागात संबंधित हेतूंना चालना देत सक्षम करण्याचा मूळ भावही या संस्थांकडे असतो. मात्र, याकडे पूर्णत: दुर्लक्ष करत ही महामंडळे स्वार्थी राजकारणाच्या मायाजाळात अडकली आहेत. त्याचा हेतुत: दुष्परिणाम नवोदितांना भोगावा लागतो आहे. गेल्याच महिन्यात चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभाेसले यांना पदच्युत करण्याचा डाव संबंधित कार्यकारिणीने आखला होता. निवडणुकीला अवघे एक-दोन महिने शिल्लक असताना रचलेला हा डाव अध्यक्षांच्याच सारवासारवीने मागे पडला. याचे पडसाद राज्यभरात उमटले आणि महामंडळात दोन गट निर्माण झाले. प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा चपळाईने आतून घरघर लावण्याचे प्रयत्न अतोनात सुरू असतात. असाच प्रयत्न विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याविरोधात सुरू आहे. त्याला तितकेसे जबाबदार ते स्वत:ही आहेतच. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या धोरणाचा परिणाम, त्यांना निवडून देणारे सदस्य त्यांच्याच विरोधात गेले आहेत आणि त्यांना पदच्युत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे, या राजकारणात तरबेज असलेले कांबळी विरोधकांना घासही टाकत नाहीत. या सगळ्या दुफळीचा परिणाम मुख्य हेतूंवर होत असल्याने नवोदितांनी कुणाकडे बघावे, असा प्रश्न आहे.

आपसी मतभेदामुळे रचनात्मक कार्य दुर्लक्षित

या महामंडळांमध्ये असलेल्या कायमच्या आपसी मतभेदांमुळे संघटनदृष्ट्या व्हावयाच्या रचनात्मक कार्यांकडे दुर्लक्ष होत आहे. राजकीय घरघर लागल्याने पुन्हा एकदा सांस्कृतिक क्षेत्राला उपेक्षेची उधळी लागली आहे. नाट्य परिषदेने तर विदर्भात अपेक्षित कामे करणे दूरच, रंगकर्मींचा विमा, नाट्यगृह, संहिता संवर्धनासारख्या महत्त्वाच्या कामाकडे कधी ढुंकूनही बघितले नाही, हे विशेष.

...........