शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

निर्बंधांचे पालन न केल्यामुळेच इटलीसमोर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:16 IST

‘‘रुग्णवाहिका जेव्हा रस्त्यांनी जातात तेव्हा तेथील रहिवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो. मनात विचार येतो की, कोरोनाने जीव घेतलेल्या त्या दुर्दैवी लोकांच्या यादीत आणखी एकाची भर पडली की काय? इटली म्हणजे अनेकांच्या स्वप्नांना साकार करणारा देश.

ठळक मुद्देकोरोनाला भारतीयांनी गांभीर्याने घ्यावे मीनाक्षी आणि ज्ञानेश भास्कर यांचे कळकळीचे आवाहन

अंकिता देशकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दुसऱ्या महायुद्धात इटलीला फारच उद््ध्वस्त व्हावे लागले. त्यानंतर युरोपमधील अत्यंत उत्साही, तरतरीत अशा इटालियन लोकांसमोर प्रथमच कोरोना विषाणूने फार मोठे संकट उभे केले आहे. इटलीने निर्बंधांचे पालन न केल्यामुळेच इटलीसमोर फार मोठे संकट उभे ठाकले आहे.‘‘रुग्णवाहिका जेव्हा रस्त्यांनी जातात तेव्हा तेथील रहिवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो. मनात विचार येतो की, कोरोनाने जीव घेतलेल्या त्या दुर्दैवी लोकांच्या यादीत आणखी एकाची भर पडली की काय? इटली म्हणजे अनेकांच्या स्वप्नांना साकार करणारा देश.आज याच देशाचे रूपांतर असे भयाण स्वप्नात होईल याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. लोकांनी आता हळूहळू आशा सोडून देण्यास सुरुवात केली आहे; परंतु आपली श्रद्धा नष्ट होणार नाही याची ते अजूनही कारणे शोधत आहेत,’’ असे मीनाक्षी यांनी म्हटले. संपूर्ण इटलीत परिस्थिती वाईट असून कोविड-१९ च्या फटक्यातून कोणताही प्रांत सुरक्षित राहिलेला नाही, असे भास्कर यांनी सांगितले. सध्या देशात संपूर्ण लॉकडाऊन असून लोकांना फक्त अत्यावश्यक खरेदीसाठीच रस्त्यांवर येऊ दिले जात आहे. इटलीत परिस्थिती इतकी का खालावली, असे भास्कर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘अगदी सुरुवातीपासूनच लोकांनी सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन केले असते आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला असता तर त्यापैकी बहुतेक जणांना कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहता आले असते.’’ भास्कर यांनी सांगितले की, ती आता दारांच्या कड्या, मुठी, कार्सचे सीट बेल्टस् जंतुनाशक वापरून पुसून घेते. हे कुटुंब १४ मार्च रोजी भारतात येणार होते; परंतु लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे रद्द झाले.या कठोर परीक्षेच्या दिवसांत हे जोडपे एवढे आशावादी कसे राहू शकले? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘‘माझ्या कुटुंबियांनी दिलेले प्रेम व घेतलेली काळजी आणि दूरध्वनीद्वारे आमच्या संपर्कात असलेले मित्र हे आमच्या सकारात्मकतेचे स्रोत आहेत.’’ देशात पोलिसांकडून मदत व दयाळूपणा अनुभवास येतो का, असे विचारले असता भास्कर यांनी कळवले की, ‘‘वयोवृद्धांच्या मदतीसाठी ते धावतात, त्यांना अन्न, खाद्यपदार्थ व औषधे आणून देण्याचे काम ते करतात. वसाहतींत मदत करताना पोलीस अनेक ठिकाणी दिसतात. ते नेहमीच मदतीचा हात पुढे करताना दिसतील.’’परिस्थितीचे गांभीर्य संपूर्ण जगात लोकांनी समजून घेण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. लोक अगदी सहजपणे प्रतिबंधक उपायांचे, नियमांचे उल्लंघन करतात व मला काहीच होणार नाही, असा समज करून घेतात; पण असे वर्तन करणाऱ्यांना कोरोना व्हायरस महामारीने चुकीचे सिद्ध केले आहे.इटलीने परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही व आज जगात सगळ्यात मोठा फटका सोसत असलेला असा तो देश बनला आहे. सगळ्यांसाठीच अत्यंत कठोर परीक्षेच्या या दिवसांत अत्यावश्यक सेवा पुरवत असलेल्या लोकांबद्दल आपण प्रत्येकाने कृतज्ञ राहिले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. अशा मदतीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर उपलब्धही आहेत. इटलीने ज्या चुका केल्या त्यापासून भारताने धडा घेऊन त्या करू नयेत, असेही आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस