लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून साडेसहा लाख रुपये हडपल्या प्रकरणी समृद्धी जीवन मल्टीस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक सुवर्णा आर. मोतेवार (वय ५०) यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.नंदलाल कन्हैयालाल अडवाणी (वय ४५, रा. जरीपटका) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुवर्णा मोतेवार यांनी त्यांच्या मुंजे चौकातील सोसायटीच्या कार्यालयात रक्कम गुंतविल्यास अल्पावधीत जास्त व्याजासह मोठा परतावा देण्याचा दावा केला होता. प्रारंभी गुंतविलेल्या रकमेवर अडवाणी यांना दोन वर्षे तसा परतावाही मिळाला. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि अडवाणी यांनी वेगवेगळ्या योजनांमध्ये ६ लाख, ५० हजार रुपये गुंतविले. २२ जून २०१७ ला ती रक्कम परत मिळायला हवी होती. मात्र, आरोपी मोतेवार यांनी आपल्या सोसायटीला टाळे लावून येथून पलायन केले. त्यांनी रक्कम हडपून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने अडवाणी यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून चौकशी झाल्यानंतर मंगळवारी सीताबर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला.
समृद्धी जीवन मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:20 IST
आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून साडेसहा लाख रुपये हडपल्या प्रकरणी समृद्धी जीवन मल्टीस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक सुवर्णा आर. मोतेवार (वय ५०) यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
समृद्धी जीवन मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालकावर गुन्हा
ठळक मुद्देआकर्षक परताव्याचे आामिष : सहा लाख हडपले