शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात नागपूरपासून व्हावी

By आनंद डेकाटे | Updated: May 22, 2024 17:34 IST

शैलेश टेंभुर्णीकर : जैवविविधतेवर राज्यस्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूर शहराच्या सभोवताली सेमिनरी हिल, गोरेवाडा आणि अंबाझरी तलाव भागात मोठया प्रमाणात जैवविविधता आढळून येत असल्याने जैवविविधतेचे केंद्र म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. त्यामुळे शहारातील जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी महानगर पालिकेने जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यातील या उपक्रमाची सुरुवात नागपुरातून करावी, अशी सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी बुधवारी केली. तसेच, नागपूर जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हीत करून जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने कार्य व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने येथील चिटणवीस सेंटरच्या टॅमरिंड सभागृहात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी टेंभुर्णीकर बोलत होते. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव एम.श्रीनिवास राव, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक विराज पवनीकर, राजीव गांधी बौद्धिक संपदा संस्थेचे श्री. सूर्यवंशी, उपवन संरक्षक डॉ. भारतसिंह हुडा यावेळी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यातील विविध तलावांशेजारील जैवविविधतेचे संवर्धन होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेने वनविभागाच्या समन्वयाने कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ.अभिजीत चौधरी यांनी जैवविविधता ही मानवाला निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत त्याच्या संवर्धणासाठी लोकसहभागाची गरज व्यक्त केली. मनपाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या जैवविविधता रजिस्टरची माहिती त्यांनी दिली. नागरी भागात जैवविविधता जपण्यासाठी येणाऱ्या मर्यादा अधोरेखित करताना मनपा क्षेत्रात जैवविविधता जपण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत सकारात्मकताही त्यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची माहिती देतांना सौम्या शर्मा यांनी जैवविविधता संवर्धनासाठी नागपूर जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले. जैवविविधता संवर्धनासाठी जिल्हा परिषदेद्वारे सुरु करण्यात आलेल्या इको क्लबची त्यांनी माहिती दिली.

 

टॅग्स :nagpurनागपूर