क्रेझ समुद्रकिनारे आणि हिल स्टेशनची

By Admin | Updated: May 24, 2014 01:14 IST2014-05-24T01:14:53+5:302014-05-24T01:14:53+5:30

उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणी जाण्याप्रमाणेच समुद्रकिनारी जाऊन पाण्यात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटण्याकडे पर्यटकांचा कल वाढत आहे. लोणावळा, महाबळेश्वर या हिल स्टेशनप्रमाणे गणपतीपुळे,

Craze Beach and hill station | क्रेझ समुद्रकिनारे आणि हिल स्टेशनची

क्रेझ समुद्रकिनारे आणि हिल स्टेशनची

नागपूर : उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणी जाण्याप्रमाणेच समुद्रकिनारी जाऊन पाण्यात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटण्याकडे पर्यटकांचा कल वाढत आहे. लोणावळा, महाबळेश्वर या हिल स्टेशनप्रमाणे गणपतीपुळे, रत्नागिरी, अलिबाग, चिपळूणसारख्या ठिकाणी समुद्रकिनारी जाऊन धमाल करण्याला सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. वर्षभरामध्ये पर्यटनाला किती नागरिक जातात, कुठे जातात, हे जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला. त्यामध्ये ७० टक्के पर्यटक हिल स्टेशन आणि समुद्रकिनारी फिरायला जात असल्याचे दिसून आले, तर धार्मिक ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांची संख्या २० टक्के आहे. प्रत्येक ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला गर्दी होताना दिसते. एक ते दोन दिवस फिरायला जाण्याकरिता लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तर, समुद्रकिनार्‍याची मजा अनुभवण्याकरिता कोकणात रत्नागिरी, चिपळूण, दापोली, अलिबाग यासारखी ठिकाणे आहेत. राज्यभरात पर्यटनाकरिता थंड हवेची आणि समुद्रकिनारे असलेली ठिकाणे असली, तरी ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देण्याकडेही पर्यटकांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. अष्टविनायक आणि १२ ज्योतिर्लिंग यात्रा अष्टविनायक यात्रेला जाणार्‍यांची संख्या वाढत आहे. खासगी कंपन्यांसह एसटी महामंडळातर्फे अशा अनेक सहली आयोजित केल्या जात असल्याने पर्यटकांची सोय होऊ लागली आहे. राहणे, जेवण आणि इतर सोयीसुविधा यात्रा कंपनीमार्फत केल्या जात आहेत. बारा ज्योतिर्लिंग यात्रेचे नियोजनही उत्तम प्रकारे होत असल्याने मागणी वाढली आहे. परदेश दौर्‍यांकडे ओढा वाढला दार्जिलिंग, मनाली, राजस्थान, कन्याकुमारी, केरळ, काश्मीर, म्हैसूर, हैदराबाद, दिल्लीसह अनेक भागांमध्ये सामान्य पर्यटक जातात; परंतु उच्च मध्यम वर्ग आणि उच्च वर्गातील अनेक जण देशांतर्गत पर्यटनापेक्षा परदेशातील ठिकाणी फिरायला जात असल्याचे दिसून आले आहे. दुबई, सिंगापूर, अबुधाबी, मॉरिशस, श्रीलंका, नेपाळ, लंडन, स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये जाण्याकरिता पर्यटन कंपन्यांकडे बुकिंग होऊ लागले आहे.

Web Title: Craze Beach and hill station