शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘गॅस्ट्रोकॉन’वर १० पासून परिषद

By admin | Updated: January 8, 2015 01:20 IST

मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’वर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन १० जानेवारीपासून रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये होणार आहे.

मिडासचे आयोजन : देश-विदेशातील डॉक्टर्स हजर राहणार नागपूर : मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’वर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन १० जानेवारीपासून रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये होणार आहे. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी सांगितले की, पोट, आतडे आणि यकृत यांच्याशी संबंधित विकारावर परिषदेत चर्चा होणार आहे. सकाळी आणि दुपार असे दोन सत्र राहील. सकाळचे सत्र सकाळी १० वाजता आणि दुपारचे सत्र दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. परिषदेत संवादात्मक सत्र, गटचर्चा, केसवर आधारित तसेच विभिन्न विकारांवर चर्चा होणार आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशातील जवळपास ९५० डॉक्टरांनी परिषदेसाठी नोंदणी केली आहे. आंतरराष्ट्रीय वक्त्यांसह ६० फॅकल्टी सदस्य उपस्थित राहतील. यामध्ये इंग्लंडचे डॉ. जे.बी. दिलावरी, अमेरिकेतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कुलविंदर दुवा तसेच पीजीआय चंदीगडचे संचालक डॉ. योगेश चावला. आशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हैदराबादचे संचालक डॉ. डी. नागेश्वर रेड्डी, बलवेव इन्स्टिट्यूट आॅफ डायजेस्टिव्ह सायन्सेसचे मुख्य एन्डोस्कोपिस्ट डॉ. अमित मेदेव, मेदांता इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीचे गॅस्ट्रोएन्टरोलॉजीचे संचालक डॉ. रणधीर सूद प्रामुख्याने उपस्थित राहतील. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने वर्षातून दोनदा अशा परिषदेचे आयोजन करण्यात येते. पत्रपरिषदेत डॉ. वैभव गंजेवार, डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. शरद देशमुख आणि डॉ. विजय वर्मा उपस्थित होते. (प्रतिनिधी)