शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ला मोदींच्या घरातूनच सुरुंग

By admin | Updated: April 30, 2015 02:22 IST

देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत.

नागपूर : देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत. परंतु ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या संकल्पनेला मोदी यांच्या घरूनच आव्हान मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी खुलेपणाने भ्रष्टाचाराचे समर्थन केले आहे. नागपुरात आयोजित एका पत्रपरिषदेदरम्यान रेशन दुकानदारांच्या मुद्यावर बोलताना प्रल्हाद मोदी यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.‘आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स’चे उपाध्यक्ष असलेले प्रल्हाद मोदी हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याविषयी माहिती देत असताना मोदी यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. देशातील सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच रेशनच्या व्यवस्थेत फारसा फरक पडलेला नाही. आता ही प्रणाली ‘हायटेक’ रूप घेत आहे. परंतु दुसरीकडे दुकानदारांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. रेशन दुकानदारांप्रती केंद्र शासनाचे धोरण उदासीन आहे. मागणी अगोदरच कमी झाली असताना दुकानदारांना अत्यल्प कमिशनवर काम करावे लागत आहे. अशा स्थितीत कुटुंबीयांना पोसण्यासाठी दुकानदारांना गैरप्रकार करावे लागतात. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात काहीच वावगे नाही असे मोदी यांनी प्रतिपादन केले. यासंदर्भात मार्च महिन्यात नवी दिल्ली येथे मोठे आंदोलन उभारले होते. केंद्र शासनाने रेशन दुकानदारांना महिन्याला २५ हजार रुपये तरी कमिशन मिळेल असे धोरण तयार करावे किंवा त्यांना शासकीय कर्मचारी तरी घोषित करावे अशी मागणी मोदी यांनी केली. संपूर्ण देशासाठी एकच धोरण तयार करण्याची गरज आहे. मागील शासनांप्रमाणेच मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनेदेखील या मुद्यावर मौन साधले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यात लक्ष घालावे असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)