शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा इलेक्ट्रिक बस प्रकल्प वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: केंद्र शासनाकडून शहरात इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी २० कोटींचे अनुदान मंजूर आहे. पहिला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: केंद्र शासनाकडून शहरात इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी २० कोटींचे अनुदान मंजूर आहे. पहिला हप्ता साडेतीन कोटींचा मनपाला प्राप्त झालेला आहे. परंतु, आयुक्तांकडून या प्रकल्पात आडकाठी आणली जात आहे. त्यामुळे हा निधी केंद्र सरकारकडे परत जाण्याची शक्यता असल्याने इलेक्ट्रिक बस प्रकल्प वांद्यात सापडल्याची माहिती परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी गुरुवारी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यासाठी अनुदान मंजूर केले. या प्रकल्पातंतर्गत नागपुरात १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात मनपाने ४० बसेस खरेदी करण्यास मंजुरीही दिली आहे. त्याअनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. मे. औलेक्ट्रा ग्रीन टेक प्रा. लिमिटेड कंपनीची एकमेव निविदा आली. त्यामुळे तीनवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. परंतु तिन्ही वेळा एकाच निविदाकारांनी निविदा भरली. निविदा दर अधिक असल्याने तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीसोबत वाटाघाटी करून निविदा दर ७१.८० रुपयांवरून कमी करून ते ६६.३३ रुपयांवर आणले. त्यानंतर प्रतिकिलो ६६.३३ रुपये दराला परिवहन समितीने मंजुरी दिली. मे. ओलेक्ट्रा ग्रीन टेक प्रा. लिमिटेडसोबत मनपाने करारनामा केला. केंद्र शासनाकडून बस खरेदीसाठी ३.६० कोटी मनपाला प्राप्त झाले आहे.

या करारनाम्यानुसार मनपाच्या परिवहन विभागाला हैद्राबाद येथे जाऊन बसची पाहणी करून बसमध्ये काही सुधारणा करावयाच्या असल्यास तसे कंपनीला सूचित करावयाचे आहे. त्यानुसार कंपनी प्रारंभी दहा बसेस तयार करील. त्यासाठी कंपनीला ३ कोटी ६० लाख रुपये द्यायचे आहेत. परंतु, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप बाल्या बोरकर यांनी केला आहे.