Coronavirus: रेल्वे स्थानकावर कोरोनाचा संशयित रुग्ण; पोलिसांची उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 16:10 IST2020-03-22T15:32:26+5:302020-03-22T16:10:47+5:30
दिल्ली विमानतळावर आल्यानंतर तेथे कोरोना संशयित रुग्णाची प्रकृती खालावली.

Coronavirus: रेल्वे स्थानकावर कोरोनाचा संशयित रुग्ण; पोलिसांची उडाली खळबळ
नागपूर : रेल्वे स्थानकावर आढळला कोरोना संशयित, आमदार निवासात दाखल नागपूर, रेल्वे स्थानकावर करोना संशयित आढळल्याने खळबळ उडाली. लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने कोरोना संशयित रुग्णाला तात्काळ ताब्यात घेऊन आमदार निवासात दाखल केले.
विजयवाडा येथील 20 वर्षीय युवक रशिया मस्को येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. शनिवारी दिल्ली विमानतळावर आल्यानंतर तेथे कोरोना संशयित रुग्णाची प्रकृती खालावली. त्यानंतर रुग्णाच्या हातावर विलगिकरणाचा शिक्का मारण्यात आला आहे. तसेच संशियित रुग्णाला प्रवास न करण्याचा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील संशयित रुग्णाने 12622 नवी दिल्ली चेन्नई राजधानी एक्सप्रेसने विजयवाडाकडे निघाला. यानंतर इटरसीजवळ एका प्रवाशाला संशयित रुग्णाच्या हातावर विलगिकरणाचा शिक्का दिसला. प्रवाशाने ही महिती ट्रेनमधील टिटीला दिली. टिटीने प्रशासनाला कळविले. यानंतर नागपूर रेल्वे स्थानकावर त्याला ताब्यात घेऊन आमदार निवासात भरती करण्यात आले आहे.