शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus in Nagpur : नागपुरात  आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 8:07 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या १४ दिवसांपासून भरती असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी सुटी देण्यात आली.

ठळक मुद्देमेडिकल : बाधित महिला रुग्णाच्या नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या १४ दिवसांपासून भरती असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी सुटी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना या रुग्णांनी सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. ४५ वर्षीय या व्यक्तीला मेयोच्या वॉर्ड क्र. २५मध्ये ठेवण्यात आले होते. याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची ४३ वर्षी पत्नी व अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोन ४५ वर्षीय पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. या तिघांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. पहिल्या रुग्णाचे तिन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना २६ मार्च रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर दोन्ही पुरुषांचेही तिन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सुटी देण्यात आली. महिला रुग्णाचा दुसरा नमुना शुक्रवारी निगेटिव्ह आला. तिसरा नमुना पाठविण्यात आला असून तो निगेटिव्ह आल्यास त्यांनाही सुटी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आजपासून नव्या जीवनाला सुरुवात करीत असल्याच्या भावना डॉक्टरांकडे व्यक्त केल्या. हे बंदिस्त १४ दिवस बरेच काही शिकवूनही गेले, असेही ते म्हणाले. त्यांनी लोकांना विशेषत: युवकांना घरीच राहण्याचे व भीती न बाळगता काळजी घेण्याचे आवाहनही केले. रुग्णालयातून सुटी झाले तरी पुढील १४ दिवस दोन्ही रुग्णांना घरीच राहण्यास सांगितले आहे. बाधित रुग्णांची सेवा करून त्यांना रोगमुक्त करणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडून कौतुक करण्यात आले. रुग्ण बरा झाल्याने डॉक्टरांसोबतच कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो. भीती दूर होते. उत्साह वाढतो, असेही डॉ. मित्रा म्हणाले. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनीही डॉक्टरांपासून ते परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर