Coronavirus in Nagpur; रेल्वेचे ११ कोविड केअर कोच अजनीत सज्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:26 PM2021-05-03T13:26:39+5:302021-05-03T13:26:57+5:30

Coronavirus in Nagpur कोविड साथीच्या आजाराशी लढण्यासाठी रेल्वेने कोच तयार केले आहेत. हे कोच भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जातील.

Coronavirus in Nagpur; Railway's 11 covid Care Coach ready in Ajni | Coronavirus in Nagpur; रेल्वेचे ११ कोविड केअर कोच अजनीत सज्ज 

Coronavirus in Nagpur; रेल्वेचे ११ कोविड केअर कोच अजनीत सज्ज 

Next
ठळक मुद्देप्रत्येक कोचमध्ये १६ रुग्णांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड साथीच्या आजाराशी लढण्यासाठी रेल्वेने कोच तयार केले आहेत. हे कोच भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जातील. ११ डब्यांची (गैरवातानुकूलित) रॅक आणि एक वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कोच हे इनलँड कंटेनर डेपो, अजनी येथे सज्ज ठेवण्यात आले असून, रविवारपासून ते महानगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर विभाग, मध्य रेल्वे आणि आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्यातील सामंजस्य करारानुसार रेल्वे आणि नागपूर महानगरपालिकेची कर्तव्ये व जबाबदाऱ्या असतील. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना एमएचएफडब्ल्यूने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा डोनिंग आणि डॉफिंगसाठी, वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय उपकरणे ठेवण्यासाठी एक कोच वापरला जाईल. बाकीचे ११ कोच कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जातील. जेथे प्रत्येक कोचमध्ये १६ रुग्ण म्हणजेच प्रत्येक कम्पार्टमेंटमध्ये ०२ रुग्ण (एकूण १७६ बेड) ॲडमिट केले जाऊ शकतात. प्रत्येक कोचमध्ये स्टँडसह २ ऑक्सिजन सिलिंडर्स देण्यात आले आहेत. प्रत्येक खिडकीला डास प्रतिबंधक जाळी पुरविली गेली असून प्रत्येक कोचमध्ये नऊ विंडो कूलर बसविण्यात आले आहेत.

उन्हाळ्याच्या काळात तापमान कमी करण्यासाठी कोचिंगच्या छतावर कूलिंग सिस्टिम पुरविण्यात आली आहे. सर्व कोचमध्ये पाणी व विद्युत सुविधा देण्यात आल्या आहेत. कोच आणि बेडच्या वापरासाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक चिन्हे देण्यात येत आहेत.

रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी पुरेशा चादरी, लीननची व्यवस्था करण्यात आली आहे. सौम्य लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना या कोचमध्ये हलविण्यात येईल. कोणत्याही वाईट परिस्थितीत किंवा रुग्णाची लक्षणे/परिस्थिती बिघडू लागल्यास रुग्णांना तातडीने उच्च केंद्रात म्हणजेच समर्पित कोविड रुग्णालयात स्थलांतरित करण्यासाठी या डब्यांजवळ २४ बाय ७ रुग्णवाहिका उपलब्ध असेल. मनपाने नेमलेले वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर आणि कर्मचारी येथील कोचमधील रुग्णांना सेवा देणार आहेत. जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियुक्त केलेल्या कचरा विल्हेवाट करणाऱ्या एजन्सीकडून राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कचरा विल्हेवाट केली जाईल.

Web Title: Coronavirus in Nagpur; Railway's 11 covid Care Coach ready in Ajni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.