शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : दिल्ली प्रवाशांनी नागपुरातील विलगीकरण कक्ष फुल्ल : ११७ संशयितांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:56 IST

दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे.

ठळक मुद्दे१०९ संशयितांचे नमुने निगेटिव्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे. आज दिवसभरात मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १०९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. यात तबलिग जमातमधील व्यक्तींचे नमुने नसल्याची माहिती आहे. नागपुरात आतापर्यंत १६ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील चार रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित १२ मधून नऊ रुग्ण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) तर तीन रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेयोमध्ये सध्या ३८ तर मेडिकलमध्ये १९ संशयित रुग्ण भरती आहेत. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेले तीन रुग्ण नागपुरात पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय, निजामुद्दीन मरकजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने येथून नागपुरात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आज दिवसभरात दिल्ली आणि मरकजमधून आलेल्या एकूण ११७ संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सध्या आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात ३२८, वनामतीच्या विलगीकरण कक्षात ८४ तर रविभवनाच्या विलगीकरण कक्षात ३३ संशयितांना ठेवण्यात आले आहे. मेयो, मेडिकलची चमू या विलगीकरण कक्षात जाऊन त्यांचे नमुने घेत आहे. उद्या शुक्रवारी यातील काही नमुन्यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.तो रुग्ण निगेटिव्हमध्य प्रदेश सिवनी येथील ५५ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाला मंगळवारी सायंकाळी नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी घेण्यात आलेल्या नमुन्याचा आज गुरुवारी निगेटिव्ह अहवाल आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLA Hostelआमदार निवास