शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह : २५ मे नंतर पहिल्यांदाच रुग्णांचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:16 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या ६८२: धंतोली, सेमिनरी हिल्स येथे कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, हॉटस्पॉट ठरलेल्या नाईक तलाव येथून ३३ रुग्णांची नोंद झाली. धंतोली व सेमिनरी हिल्समध्येही कोरोनाचा शिरकाव झाला असून येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ४३ नमुने पॉझिटिव्ह आले. यात ३३ रुग्ण नाईक तलाव येथील आहेत. यात सर्वाधिक पुरुष रुग्ण असून लहान बालकांचाही यात समावेश आहे. हे सर्व रुग्ण पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये होते. मोमीनपुरा येथील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. गुरुवारी मध्य प्रदेशातील सारी रुग्णाचा मृत्यूनंतर त्याचा मुलगाही पॉझिटिव्ह आला आहे. या शिवाय, हिंगणा रोडवरील एक, लकडगंजमधील एक, बाजारगाव कोढाळी येथील एक तर सेमिनरी हिल्स येथील एक रुग्णाची नोंद झाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील आठ रुग्ण मोमीनपुरा येथील तर दोन रुग्ण टिमकी येथील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक अमरावती येथील तर दुसरा रुग्ण गोंदिया येथील आहे. हे दोन्ही रुग्ण ‘सारी’ म्हणून भरती झाले असताना ते ‘कोविड पॉझिटिव्ह’ आले आहेत. खासगी प्रयोगशाळेतून धंतोली येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाला एम्समध्ये दाखल केले आहे. एम्समध्ये आज १६ रुग्ण भरती झाले असून रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.हॉटस्पॉट ठरलेल्या नाईक तलाव येथे ७९ रुग्णमोमीनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी वसाहतीनंतर नाईक तलाव, बांगलादेश ही वसाहत हॉटस्पॉट झाली आहे. मोमीनपुरा येथे आतापर्यंत सर्वाधिक २३१ रुग्णाची नोंद झाली. सतरंजीपुरा वसाहतीत ११२ तर टिमकी वसाहतीत ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. आता टिमकी वसाहतीला मागे टाकून नाईक तलाव व बांगलादेश येथील आजच्या ३३ रुग्णांसह रुग्णांची संख्या ७९वर पोहचली आहे. येथून आणखी पॉझिटिव्ह रुग्ण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.धंतोली, सेमिनरी हिल्स रुग्णाची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमीधंतोली येथील ४६ वर्षीय पुरुष काही दिवसापूर्वी दिल्ली येथून घरी परतले. गुरुवारी लक्षणे दिसून आल्याने एका खासगी प्रयोगशाळेत नमुना तपासला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पहिल्यांदाच धंतोली येथे रुग्णाची नोंद झाली आहे. मनपाने हा परिसर सील केल्याचे सांगण्यात येते. या शिवाय, सेमिनरी हिल्स येथील एका सोसायटीमधील ४० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. या महिलेचीही दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे. यांचे पती सैन्यात असल्याने त्यांनी गुरुवारी कामठी येथील सैन्याचा रुग्णालयात नमुना दिला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.सहा रुग्णांना रुग्णालयातून सुटीमेयोमधून पाच तर मेडिकलमधून एका रुग्णाला सुटी देण्यात आली. यात मोमीनपुरा येथील २१वर्षीय महिला, टिपू सुलतान चौक येथील २७ वर्षीय पुरुष, सिरसपेठ येथील ५० वर्षीय महिला, याच वसाहतीतील ६४ वर्षीय पुरुष व बजेरिया येथील १६ वर्षीय युवतीचा समावेश आहे. या रुग्णांनी पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहणार असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे, तर मेडिकलमधून पश्चिम बंगाल येथून एका महिला रुग्णाला सुटी देण्यात आली. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ४२३ झाली आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १६६दैनिक तपासणी नमुने ४७६दैनिक निगेटिव्ह नमुने १२१नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६८२नागपुरातील मृत्यू १३डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४२३डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २९९४क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १६८२पीडित-६८२-दुरुस्त-४२३-मृत्यू-१३

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर