शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा नवा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत नव्या विक्रमाला सुरुवात झाली आहे. शनिवारी रुग्णसंख्येचा नवा विक्रम स्थापित झाला. एकाच दिवशी ...

नागपूर : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत नव्या विक्रमाला सुरुवात झाली आहे. शनिवारी रुग्णसंख्येचा नवा विक्रम स्थापित झाला. एकाच दिवशी २२६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मागील वर्षी १३ सप्टेंबर रोजी रुग्संख्येने उच्चांक गाठत २३४३ बाधितांची नोंद झाली होती. सहा महिन्यांनी पुन्हा १३ तारखेलाच या रुग्णसंख्येच्या जवळ बाधितांची संख्या पोहोचली; परंतु घाबरण्याचे कारण नाही. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा दर ४.४६ टक्के तर मृत्यूदर २.७१ टक्के होता. सध्या रुग्णवाढीचा दर हा १.३४ टक्के तर मृत्यूदर ०.१५ टक्के आहे; मात्र रुग्णवाढीमुळे कोरोना प्रतिबंधकाचे नियम पाळणे अधिक गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची एकूण संख्या १६८२५० झाली असून, मृतांची संख्या ४४४७ वर पोहोचली आहे.

नागपूर जिल्ह्यात आज पुन्हा चाचण्यांची संख्या वाढली. ८७८९ आरटीपीसीआर तर २२३० रॅपिड ॲन्टिजन असे एकूण ११०१९ चाचण्या झाल्या. सर्वाधिक ४३४४ चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या. यातून ५२६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३८१८ संशयित रुग्ण निगेटिव्ह आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेत १२३५ चाचण्यांमधून २७२ पॉझिटिव्ह व ९६३ निगेटिव्ह, मेयोच्या प्रयोगशाळेत ११४५ चाचण्यांमधून २८७ पॉझिटिव्ह व ८५८ निगेटिव्ह, एम्सच्या प्रयोगशाळेत ६०१ चाचण्यांमधून १९७ पॉझिटिव्ह व ४०४ निगेटिव्ह, नीरीच्या प्रयोगशाळेत २८८ चाचण्यांमधून ११२ पॉझिटिव्ह व १७६ निगेटिव्ह तर, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ११७६ चाचण्यांमधून ७७७ पॉझिटिव्ह तर ३९९ निगेटिव्ह आले आहेत. एकूणच आरटीपीसीआर चाचणीतून २१७१ तर ॲन्टिजन चाचणीतून ९० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

-शहरात १८४४ तर, ग्रामीणमध्ये ४१५ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १८४४ तर ग्रामीणमधील ४१५ रुग्ण आहेत. जिल्हाबाहेरील २ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील ३ तर जिल्हाबाहेरील २ मृत्यू आहेत. शहरात बाधितांची एकूण संख्या १२४४४५ असून, मृतांची संख्या २८६० झाली आहे. ग्रामीणमध्ये रुग्णांची एकूण संख्या ३२८२८ असून, मृतांची संख्या ७९२ झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत ९७७ रुग्ण आढळून आले. यातील ७९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

-कोरोनाचे १५४२३ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

सध्याच्या स्थितीत कोरोनाचे १५४२३ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. ही संख्या आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढविणारी आहे. यातील ४३१७ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर १११०६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. आज १०२२ रुग्ण बरे झाले असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १४८३८० झाली आहे. बरे होण्याचा दर ८८.१९ टक्क्यांवर आला आहे.

-सप्टेंबरसारखी स्थिती नाही

:: १३ सप्टेंबर ७९७३ चाचण्या, २३४३ रुग्ण व ४५ मृत्यू

::१३ मार्च ११०१९ चाचण्या, २२६१ रुग्ण व ७ मृत्यू

::कोरोनाची स्थिती

दैनिक चाचण्या: ११०१९

ए. बाधित रुग्ण :१६८२५०

सक्रिय रुग्ण :१५४२३

बरे झालेले रुग्ण :१४८३८०

ए. मृत्यू : ४४४७