शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

कोरोनाचा कहर, मृत्यूही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:08 AM

रामटेक/ सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड /कुही/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील तेरा ...

रामटेक/ सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड /कुही/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत ३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर २४०८ नव्या रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत १३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या बाधितांची एकूण संख्या ७६,७६६ झाली आहे. यातील ५१,६४५ रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. सध्या २४,८१८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. सावनेर तालुक्यात ४०४ रुग्णांची आणखी भर पडली तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सावनेर शहरात १४५ तर ग्रामीणमध्ये २५९ रुग्णांची नोंद झाली.

कळमेश्वर तालुक्याला कोरोनाने विळखा घातला आहे. येथे १८९ नवीन रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील ४१ तर ग्रामीण भागात १४८ रुग्णांचा सनमावेश आहे. तालुक्यात लोहगड येथे सर्वाधिक १७ रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात २५५ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील ७४ तर ग्रामीण भागातील १८१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ४०२२ इतकी झाली आहे. यातील १८०७ रुग्ण बरे झाले आहे. सध्या २२१३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

उमरेड तालुक्यात ७९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. काटोल तालुक्यात १२४५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ५७ तर ग्रामीण भागातील १०९ रुग्णांचा समावेश आहे.

मौदा तालुक्यात १७७ रुग्णांची नोंद झाली तर तिघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील बाधितांची संख्या २३११ झाली आहे. यातील १०९९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ११७० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. कुही तालुक्यात १३२ रुग्णांची नोंद झाली. यात कुही येथील केंद्रावर (३५), मांढळ (३७), वेलतूर (२४), साळवा (९) तर तितूर येथे २७ रुग्णांची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात १४३६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २४३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिह आले. तालुक्यात वानाडोंगरी येथे सर्वाधिक ८२ रुग्णांची नोंद झाली.

नरखेड ग्रामीणमध्ये स्थिती चिंताजनक

नरखेड तालुक्यात शुक्रवारी २८३ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील १४ तर ग्रामीण भागातील २६९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १४१८ तर शहरातील २२७ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावअंतर्गत ९७, जलालखेडा (८६), मेंढला (५८) तर मोवाड येथे २८ रुग्णांची नोंद झाली. यात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ९ पैकी ७ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर व नरखेड तालुक्यातील रुग्णांच्या ओपीडीचा भार फक्त दोन डॉक्टर सांभाळत आहेत.