शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लक्षणे मेंदूतही दिसू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 23:23 IST

कोरोना रुग्णामध्ये प्रामुख्याने ताप, कोरडा खोकला आणि श्वास लागण्याची लक्षणे दिसून येतात. परंतु यापूर्वी मेंदूमध्ये काही लक्षणे दिसून येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मेंदू संसर्ग विभागाचे प्रमुख डॉ. अविन्द्र नाथ यांनी दिली.

ठळक मुद्देअमेरिकेचे तज्ज्ञ नाथ यांनी मेश्राम यांच्याशी साधला संवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोना रुग्णामध्ये प्रामुख्याने ताप, कोरडा खोकला आणि श्वास लागण्याची लक्षणे दिसून येतात. परंतु यापूर्वी मेंदूमध्ये काही लक्षणे दिसून येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मेंदू संसर्ग विभागाचे प्रमुख डॉ. अविन्द्र नाथ यांनी आज भारतातील मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्याशी व इतरांशीही ऑनलाईनवरून संपर्क साधला असता ही माहिती दिली. डॉ. नाथ म्हणाले, ‘स्मॉल पॉक्स’, इन्फ्लूएन्जा, प्लेग, स्वाईन फ्लू यांसारख्या साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला प्रभावित केले होते. १९१८मध्ये आलेला ‘फ्लू’ हा मानवी इतिहासातील सर्वात प्राणघातक होता. त्या काळात जगातील २५ टक्के लोक या रोगाने प्रभावित झाले होते आणि पाच कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर साधारण १०० वर्षांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. डॉ. नाथ यांनी नमूद केले की, कोरोनामध्ये चक्कर येणे, डोकेदुखी, चेतना कमी होणे, पक्षाघात, चालताना तोल जाणे, मेदूज्वर, मिरगी येणे आदी लक्षणेही दिसून येऊ शकतात. उदासीनता, घाबरणे, धडधडणे, चिडचीड होणे, भास होणे आदी मानसिक त्रासही होतो. या शिवाय, वास-गंध न येणे, चव गमावणे, स्रायूच्या दुखापतीचा त्रास होणे ही लक्षणेसुद्धा दिसून येतात. काही मेंदूचे आजार जसे पक्षाघात हा न्युमोनिया होण्यापूर्वी येऊ शकतो. यामुळे याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णामध्ये मेंदूच्या सभोवती असलेल्या द्रव्यामध्ये कोरोनाचे विषाणू दिसून आलेत. प्राण्यांवरील संशोधनात असे दिसून आले की, नाकाद्वारे विषाणू मेंदूमध्ये आणि फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात.कोरोनावर तीन हजारावर संशोधने सुरूकोरोनावर उपचार शोधण्याकरिता सध्या जगात साधारण तीन हजार संशोधने सुरू आहेत. सध्यातरी कोरोनावर उपचार नाहीत. काही रुग्णांना त्रास कमी असतो आणि ते स्वत: बरेही होतात. प्रतिबंधक लसीची चाचणी सुरू आहे. परंतु रुग्णसेवेत यायला आणखी बराच कालावधी आहे. यामुळे प्रत्येकाने शासनाच्या सूचनांचे पालन करावे. घरीच थांबल्यास व इतरांपासून दूर राहिल्यास या रोगाला दूर ठेवणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर