शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ची सुटी ‘एन्जॉय’साठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 10:52 IST

महाविद्यालयांतील अध्यापनाचे कार्य ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत जर ते शहरात अनावश्यकपणे फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे विद्यार्थी अनावश्यक फिरताना आढळले तर कारवाईमहाविद्यालयांत आजपासून अध्यापनाला सुटी प्रशासकीय इमारतीत अभ्यागतांना प्रवेशबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सुट्यांसंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व विभाग, संचालित व संलग्नित महाविद्यालयांतील अध्यापनाचे कार्य ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांनी वसतिगृह किंवा घरातच थांबावे. जर ते शहरात अनावश्यकपणे फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू झाल्यानंतर सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून पत्र आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी रविवारी परिपत्रक जारी केले. सर्व विभाग, महाविद्यालयांतील अध्यापनाचे कार्य ३१ मार्चपर्यंत बंद राहील. परंतु प्रशासकीय व इतर कामकाज सुरू राहील, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.ज्या विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे, ते अनावश्यकपणे फिरणार नाहीत.ते संबंधित वसतिगृहे किंवा घरी स्वत:ला सुरक्षित ठेवतील. ते अनावश्यक फिरणार नाहीत, अशी सूचना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना द्याव्यात. जर कुणी अनावश्यकपणे फिरताना दिसून आला तर त्यांच्या विरोधात कारवाई होईल, असे त्यांना सांगण्यात यावे, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावीवसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहातील विद्यार्थी मूळ गावी परत जाऊ शकतात. जर ते गावी गेले नाही तर त्यांनी वसतिगृहातून बाहेर पडू नये, असे विद्यापीठाने सांगितले आहे. ३१ मार्चपर्यंतच्या कालावधीत विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ योजना, व्यायाम शाळा, उद्यान, अतिथीगृह व इतर क्रीडा सुविधा बंद राहतील.फिरण्याची सुविधा बंदविद्यापीठातील ‘कॅम्पस’, ‘एलआयटी’ येथे अनेक जण ‘मॉर्निंग वॉक’ला जातात. मात्र ही सुविधा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात सर्व अभ्यागतांना पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विद्यापीठाचे ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थी