शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान हे जगण्याचे तत्त्वज्ञान व्हावे

By admin | Updated: November 26, 2015 03:30 IST

रक्तदान करताना आपले रक्त कुठल्या धर्माच्या जातीच्या व्यक्तीला, श्रीमंताला मिळते की गरिबाला असे आपण विचारत नाही.

आज संविधान दिवस : सुशील मेश्राम रुजविताहेत संविधानाचे मूल्यनागपूर : रक्तदान करताना आपले रक्त कुठल्या धर्माच्या जातीच्या व्यक्तीला, श्रीमंताला मिळते की गरिबाला असे आपण विचारत नाही. कारण त्यावेळी आपली भावना मानवतावादाची असते. आपल्या रक्ताच्या थेंबाने कुणाचेतरी प्राण वाचतील, हा त्यामागचा एकमेव उद्देश असतो. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यातील रक्तदानामागची भावना ही बंधुता या मूल्यात येते. हे आपल्याला संविधान न वाचताही कळते. संविधानाने समाजाभिमुख जगण्याचे जे तत्त्वज्ञान शिकविले आहे, ते तत्त्वज्ञान प्रा. सुशील मेश्राम यांनी अंगिकारले असून, ते समाजात रुजविण्याचे कार्य ते करीत आहेत. आपण सर्वप्रथम समाजाचे, देशाचे नागरिक आहोत, ही भावना त्यांच्या कृतीतून व्यक्त होते. संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. संविधानाने मानवतावादी दृष्टिकोन दिला आहे. विश्वाचे कल्याण संविधानात आहे. सुख, शांती, समाधान निर्माण करण्यासाठी समाजात संविधान संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे संविधान दिवस हा एक दिवस साजरा करून होणार नाही. संविधान उत्सव साजरा करण्यासारखी घटना नाही. संविधान हे शिक्षित व अशिक्षिताने समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी संविधान वाचण्याचीही गरज नाही. समाजासाठी, देशासाठी आपली काय जबाबदारी आहे, हे जेव्हा आपल्या कृतीतून उतरते, त्यालाच खऱ्या अर्थाने संविधान स्वीकारले असे म्हणावे लागेल. शिक्षकी पेशात असलेले सुशील मेश्राम हाच भाव समाजात पेरण्याचा प्रयत्न करतात. ते संविधानाची प्रास्ताविका वाचण्यास सांगत नाहीत किंवा संविधानाचे पुस्तक कुणाला भेट देत नाहीत. तर संविधानात जी मूल्ये आहेत, जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते छोट्याछोट्या गोष्टीतून विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत पोहविण्याचे कार्य करतात. नेत्रदान, अवयवदान, देहदानाच्या मागची भूमिका समाजाला समजावून सांगतात. मरणोपरांतही आपल्या देहाचा समाजासाठी कसा उपयोग होईल यासाठी कार्य करतात. त्यांच्या प्रबोधनातून सेवादल महिला महाविद्यालयातील १५३ विद्यार्थिनींनी नेत्रदानाचा तर ६३ विद्यार्थिनींनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. दानाची ही भावना बंधुतेचे मूल्य आहे. (प्रतिनिधी) संविधानाची मूल्ये अभ्यासक्रमात यावीतमहाविद्यालयात त्यांनी युवती एल्गार संघाची स्थापना करून त्यांना रुढी परंपरेच्या बंधनातून मुक्त करून समतेच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करतात. विवेकी जोडीदाराची निवड या उपक्रमातून जाती, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडताना सुसंवाद घडला पाहिजे, असा विवेकी जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळवून देतात. महापुरुषांच्या संतांच्या जयंती साजरी करताना त्यात सर्वप्रथम प्रास्ताविकेचे वाचन करून, त्यामागचा उद्देश लोकांना समजवितात. त्यांच्या प्रेरणेतून काही बौद्ध विहारामध्ये पंचशीलाचे वाचन न होता संविधानाची प्रास्ताविका वाचली जाते. समाजात वावरताना जातीविरहीत, धर्माविरहीत आपले आचरण असेल, असे आपल्या प्रबोधनातून समाजामध्ये रुजवितात. संविधान बांधिलकी महोत्सव आयोजित करून देशाचा नागरिक म्हणून माझी माझ्या देशाबद्दलची बांधिलकी काय आहे, हे समजावून सांगतात. संकुचित विचारांना दूर सारून व्यापक विचार करण्यास प्रवृत्त करतात. निव्वळ प्रास्ताविकेचे वाचन नकोसंविधानाची प्रास्ताविका ही स्वयंप्रेरणेने घेतलेली प्रतिज्ञा आहे. त्यामुळे संविधान दिनाला निव्वळ प्रास्ताविकेचे वाचन करून चालणार नाही. संविधानाचा मुख्य कार्यक्रम जो नागपुरात होणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी शिक्षक ांना संविधानाची मूल्ये अभ्यासक्रमात कशी येतील, हे सांगितले पाहिजे. ते आचरणात कसे येईल, हे विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. प्रा. सुशील मेश्राम, संविधानाचे पुरस्कर्ते