शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा एल्गार, रास्ता रोको!

By admin | Updated: August 5, 2015 02:39 IST

लोकसभेत गोंधळ घातल्याच्या मुद्यावरून लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना २५ दिवसांसाठी निलंबित केले.

झाशी राणी चौकात अडविल्या बसेस : मोदींच्या पोस्टरला काळे फासले, पुतळा जाळलानागपूर : लोकसभेत गोंधळ घातल्याच्या मुद्यावरून लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना २५ दिवसांसाठी निलंबित केले. याचा निषेध म्हणून सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांनी संसदेसमोर धरणे दिले. तर, प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून नागपुरात शहर काँग्रेसनेही झांशी राणी चौकात आंदोलन करीत एल्गार पुकारला. तब्बल तासभर रास्ता रोको करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोदी यांच्या पोस्टरला काळे फासून त्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करून गुन्हे दाखल केले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते झांशी राणी चौकात जमले व मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी चौकातून जात असलेल्या स्टार बस व एसटी महामंडळाच्या बस थांबविल्या व एकूण सहा बसच्या चाव्या काढून घेतल्या. बस रस्त्यातच उभ्या राहिल्यामुळे झाशी राणी चौकातून वाहनांना जाण्यास जागाच उरली नाही. परिणामी ट्रॅफिक जाम झाले. झांशी राणी चौक ते लोकमत चौक, महाराज बाग रोड, संविधान चौक व जानकी टॉकीजपर्यंत चारही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहचले. पण बसच्या चाब्या नव्हत्या. पोलिसांनी विनंती केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बसच्या चाब्या दिल्या व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा उड्डाण पुलाला लटकविला व नंतर जाळला. एवढेच नव्हे तर मोदी यांचा फोटो असलेल्या बॅनरची प्रेतयात्राही काढली. ‘लोकशाही के देशमे, तानाशाही जोश मे’, अशी नारेबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनानंतर सीताबर्डी पोलिसांनी विकास ठाकरे यांच्यासह नगरसेवक प्रशांत धवड, उमाकांत अग्निहोत्री, पंकज निघोट, विवेक निकोसे, पंकज थोरात आदींना अटक केली व गुन्हे दाखल केले. आंदोलनात कृष्णकुमार पांडे, शेख हुसेन, नगरसेवक दीपक कापसे, योगेश तिवारी, सुजाता कोंबाडे, पद्मा उईके, प्रेरणा कापसे, रेखा बाराहाते, सरस्वती सलामे, शीला मोहोड, निमिषा शिर्के, दीपक वानखेडे, इंद्रसेन ठाकूर, राजू व्यास, गजराज हटेवार, विजय बाभरे, संजय दुबे, रामगोविंद खोब्रागडे, परमेश्वर राऊत, नाना झोडे, आकाश तायवाडे, किरण यादव, स्वप्नील काटोवर आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)पोलिसांची तारांबळकाँग्रेस एवढे तीव्र आंदोलन करेल याची पोलिसांना कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे नारेनिदर्शने होतील, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक पोलिसांचा अंदाज चुकविला. रास्ता रोको करून तब्बल पाऊण तास वाहतूक खोळंबल्यानंतर पोलीस पोहोचले. बसच्या चाव्या मिळविण्यासाठी पोलिसांना अक्षरश: विनंती करावी लागली.