शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
2
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
3
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
4
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
5
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
6
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
7
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
8
जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला
9
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 
10
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
11
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
12
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
13
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
14
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
15
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
16
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
17
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
18
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
19
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
20
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...

हज हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने : रेशीमबागमध्ये होणाऱ्या हज प्रशिक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 1:03 AM

महाराष्ट्र राज्य हज समितीने ७ जुलै रोजी रेशीमबाग येथील भट सभागृहात हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण स्थळावरून आता वाद निर्माण झाला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिक कुरैशी यांच्या नेतृत्वात हज हाऊस समोर समितीच्या निर्णयाला विरोध केला आहे. राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनमानी करीत असल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देहज हाऊसमध्येच व्हावे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य हज समितीने ७ जुलै रोजी रेशीमबाग येथील भट सभागृहात हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण स्थळावरून आता वाद निर्माण झाला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिक कुरैशी यांच्या नेतृत्वात हज हाऊस समोर समितीच्या निर्णयाला विरोध केला आहे. राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनमानी करीत असल्याचा आरोप केला आहे.एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात नागपूरसह विदर्भातून दोन हजार यात्रेकरून प्रशिक्षण घेणार आहे. नागपुरात हज हाऊस असताना प्रशिक्षण रेशीमबागेत का होत आहे? यावर आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हज हाऊस समोर निदर्शने करून प्रशिक्षण हज हाऊसमध्येच घ्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी इरशाद अली, नगरसेवक रमेश पुणेकर, हाजी मो. समीर, मुमताज अहमद, शाहबाज खान, मुख्तार अन्सारी, जुनैद अहमद, आरिफ खान, मो. हाशिम, मोहसीन शेख, इमरान शेख, अरशद अन्सारी, सुरेंद्र मेश्राम, अक्षय डोर्लीकर, अमन शेख, फैजल खान, तौसीफ कुरेशी, रिजवान खान, अब्दुल रशीद, मो. अकरम आदी उपस्थित होते.हज यात्रेवरून राजकारण - कुरेशीशहर काँग्रेस सचिव अतिक कुरेशी म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात १५ कोटी रुपये खर्चून हज हाऊस तयार करण्यात आले. २०१२ पासून हजचे प्रशिक्षण हज हाऊसमध्येच होत आहे. परंतु हज समितीचे अध्यक्ष पर्याप्त जागा नसल्याचा हवाला देत हज समितीच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून हज यात्रेवरही भाजपा आता राजकारण करीत आहे. हज प्रशिक्षण हज हाऊसमध्ये व्हावे, यासाठी समितीच्या अध्यक्षाची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी भेटण्यास नकार दिला.हज हाऊसमध्ये पर्याप्त जागा नाहीहज प्रशिक्षण शिबिरासाठी आवश्यक जागा हज हाऊसमध्ये नाही. यापूर्वीही विदर्भस्तरीय हज प्रशिक्षणाचे कार्यक्रम बाहेर झाले आहे. त्यामुळे हज प्रशिक्षणाचा कार्यक्रम योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे.मौलाना आलमगीर अशरफभट सभागृह चांगली जागा आहेराज्य हज समितीने प्रशिक्षणासाठी हज हाऊसची निवड विचारपूर्वक केली आहे. शिबिरासाठी विदर्भातून हज यात्री प्रशिक्षणासाठी येत असल्याने, त्यांच्या व्यवस्थेसाठी भट सभागृह अगदी योग्य आहे.वकील परवेज

टॅग्स :Haj yatraहज यात्राnagpurनागपूर