शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

सरपंच निवडणुकीत काँग्रेसची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

नागपूर : नागपूर जिल्ह्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थीत पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात १२९पैकी ६१ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेस समर्थीत ...

नागपूर : नागपूर जिल्ह्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थीत पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात १२९पैकी ६१ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेस समर्थीत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. यासोबतच ३५ ग्रामपंचायतींमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (१५), शिवसेना (३), वंचित बहुजन आघाडी (१), मनसे (१), तर ७ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी समर्थीत पॅनेलचे उमेदवार सरपंचपदी विजयी झाले आहेत. जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी निवडणूक झालेल्या १२९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात काटोल तालुक्यात माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी समर्थीत जया वानखेडे यांची वर्णी लागली. खंडाळा खुर्द येथे जनशक्ती पॅनेलच्या सुरेशा किशोर सय्याम, तर भोरगड येथे परिवर्तन पॅनेलचे उमराव बकराम उईके यांनी सरपंच होण्याचा मान मिळवला आहे. खंडाळा (खुर्द) आणि भोरगड ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला. नरखेड तालुक्यात १७पैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी समर्थीत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. येथे खैरगाव, पेठईस्लामपूर आणि मदना ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले. उमठा ग्रामपंचायतीच्या सरपंचदी भाजप समर्थीत पॅनेलचे प्रकाश पंजाबराव घोरपडे विजयी झाले.

पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघातील कळमेश्वर तालुक्यात ५ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस समर्थीत उमेदवारांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. सावनेर तालुक्यात १२पैकी ९ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रसचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले. तीन ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणानुसार उमेदवार नसल्याने सरपंच पदाची निवडणूक झाली नाही. या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंचपदी काँग्रेस समर्थीत गटाच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. केदार यांचे होम टाऊन असलेल्या पाटणसावंगी येथे काँग्रेसच्या रोशनी ठाकरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

कामठीत भाजपचे वर्चस्व

कामठी तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. येथे निवडणूक झालेल्या ९पैकी ६ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थीत गटाचे सरपंच आणि उपसरपंच विजयी झाले. काँग्रेस समर्थीत गटाचा केवळ ३ गावात विजय झाला. भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे होम टाऊन असलेल्या कोराडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे नरेंद्र धानोले विजयी झाले.

देवलामेटीत वंचित - काँग्रेसची आघाडी

नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देवलामेटी येथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आघाडी करीत भाजपला झटका दिला. १७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी समर्थीत रिता प्रवीण उमरेडकर यांनी प्रतिस्पर्धी भाजप समर्थीत पॅनलचे गजानन रामेकार यांचा एका मताने पराभव केला. उमरेडकर यांना ९, तर रामेकार यांना ८ मते मिळाली.

सेनेच्या गडात काँग्रेसचे सरपंच, मनसेनेही उघडले खाते

शिवसेनेचा गड असलेल्या रामटेक मतदार संघातील ९पैकी ७ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस समर्थीत गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. यासोबतच तालुक्यात पथरई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसे समर्थीत संदीप मनिलाल वासणिक विजयी झाले आहेत. मानापूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना समर्थीत संदीप मधुकर सावरकर यांची सरपंचपदी वर्णी लागली.

काँग्रेसचा ८३, तर भाजपचा ७३ ग्रामपंचायतींवर दावा

सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांकडून दावे - प्रतिदावे करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ८३ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी ७३ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच झाल्याचा दावा केला आहे.