लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३४ नगरसेवक विजयी झाले. आता या नगरसेवकांची स्वतंत्रपणे गट नोंदणी दि. २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे केली जाणार आहे.
महापालिकेत विरोधी पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस व मुस्लीम लीग एकत्र येण्याचा प्रस्तावावर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू आहे. लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
गेल्यावेळी काँग्रेसमध्ये गट नेते पदावरून बराच वाद झाला होता. यावेळी तशी परिस्थिती नाही. मात्र, इच्छुक बरेच आहेत. सद्यःस्थितीत माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर उत्तर नागपुरातील नगरसेविका भावना लोणारे यांचे नावदेखील समोर आले आहे.
एकमताने गटनेते पदाचा निर्णय व्हावा, यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस स्वतंत्रपणे गट नोंदणी करणार आहे. या गट नोंदणीत मित्रपक्ष किंवा इतरांना सोबत घेतले जाणार नाही. गट नोंदणीनंतर त्यांची नोंदणी करून सहभागी करून घेण्याची काँग्रेसची योजना आहे.
तिसरा 'स्वीकृत' मिळविण्याचे प्रयत्न
काँग्रेसचे ३४ नगरसेवक आहेत. उद्धवसेनेचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत. काँग्रेसला ३० नगरसेवकांमागे दोन स्वीकृत सदस्य मिळतील. दोनचा कोटा पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडे चार नगरसेवक उरतात. अशात मुस्लीम लीग सोबत आली तर त्यांचे चार नगरसेवक मिळतात. अशात काँग्रेसचे उरलेले चार, मुस्लीम लीगचे चार व उद्धव सेनेचे दोन सदस्य मिळून दहा सदस्य होतात. या आधारावर तिसरा स्वीकृत सदस्य पदरात पाडून घेण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.
स्वीकृतसाठी लॉबिंग जोरात
स्वीकृत सदस्यपदी आपली वर्णी लागावी यासाठी काँग्रेसमधील अनेकांनी लॉबिंग करणे सुरू केले आहे. खा. मुकुल वासनिक, खा. इस्रान प्रतापगडी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदी नेत्यांकडे इच्छुकांनी गळ घालण्यास सुरूवात केली आहे. शहर अध्यक्षांना आपल्यासाठी एक फोन करा, अशी विनंती नेत्यांकडे केली जात आहे. काहींनी तर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्याकडे शिष्टमंडळे पाठविण्यास सुरुवात केली आहे.
Web Summary : Congress explores alliance with Muslim League in Nagpur for stronger opposition. Congress to independently register its group on January 27th. Efforts underway to secure a third nominated member position. Lobbying intensifies for nominated member posts.
Web Summary : नागपुर में मजबूत विपक्ष के लिए कांग्रेस मुस्लिम लीग के साथ गठबंधन कर सकती है। कांग्रेस 27 जनवरी को स्वतंत्र रूप से अपना समूह पंजीकृत करेगी। तीसरे मनोनीत सदस्य पद को सुरक्षित करने के प्रयास जारी हैं। मनोनीत सदस्य पदों के लिए लॉबिंग तेज।