ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; सुनील केदार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 20:30 IST2020-09-03T20:25:02+5:302020-09-03T20:30:27+5:30

मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल 

Congress cabinate minister Sunil Kedar Corona Positive | ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; सुनील केदार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात

ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; सुनील केदार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात

नागपूर : पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची कोरोना चाचणी गुरुवारी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. 


केदार हे मंगळवारी नागपुरात होते. त्यांनी जिल्ह्यातील विविध भागात पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर ते मुंबईला रवाना झाले. गुरुवारी सकाळी त्यांना ताप चढला व काहिसे अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते दुपारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेले व कोरोनाची अ‍ॅन्टीजन चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह येताच ते तेथेच उपचारासाठी भरती झाले. त्यानंतर सायंकाळी आरटीपीसीआर चाचणीसाठी नमूने घेण्यात आले. त्याचा अहवाल शुक्रवारी येईल. दरम्यान, केदार यांच्या नागपूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही खबरदारी म्हणून चाचणी करून घेतली आहे.

Web Title: Congress cabinate minister Sunil Kedar Corona Positive