विधान परिषद निवडणुकीवर काँग्रेसचे मंथन, २२ जानेवारीला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 11:01 IST2023-01-18T10:59:17+5:302023-01-18T11:01:18+5:30
बैठकीत ठरणार निवडणुकीची रणनीती

विधान परिषद निवडणुकीवर काँग्रेसचे मंथन, २२ जानेवारीला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक
नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची मंगळवारी बैठक करून मंथन केले. यात स्पष्ट करण्यात आले की, काँग्रेस पक्ष या निवडणुकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन देईल. २२ जानेवारीला विभागातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आयोजित केली आहे.
माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला माजीमंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, राजेंद्र मुळक, बबनराव तायवाडे, रवींद्र दर्रेकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांना सांगण्यात आले की काँग्रेस या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांना समर्थन करेल. सुत्रांचे म्हणणे आहे की, अडबालेंना समर्थनाची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करणे गरजेचे होते; परंतु, आमदारांनी हे काम केले. पटोलेदेखील अधिकृतपणे अडबाले यांच्याच नावाची घोषणा करेल, असे सांगण्यात येत आहे.