शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
3
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
4
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
5
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
6
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
7
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
8
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
9
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
10
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
11
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
12
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
13
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
14
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
15
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
16
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
17
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
18
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
19
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यात गुंतवणुकीवर ग्राहकांमध्ये संभ्रम

By admin | Updated: June 11, 2014 01:27 IST

गेल्यावर्षी २० टक्के तर यावर्षी सोन्यात १२ टक्के घट झाली. सोन्याच्या भावात अचानक झालेल्या घसरणीमुळे सोने खरेदीचा मोह ग्राहकांना होत आहे. सोन्याचे मूल्य फक्त वाढते, असा समज करून

तेजीचे दिवस संपले : आणखी घट होणार
नागपूर : गेल्यावर्षी २० टक्के तर यावर्षी सोन्यात १२ टक्के घट झाली. सोन्याच्या भावात अचानक झालेल्या घसरणीमुळे सोने खरेदीचा मोह ग्राहकांना होत आहे. सोन्याचे मूल्य फक्त वाढते, असा समज करून घेणाऱ्या खरेदीदारांसाठी भावातील घसरण ही आनंदाची बाब आहे. पण सोन्याची खरेदी करायची की नाही, अशा दुहेरी स्थितीत ग्राहक आणि गुंतवणूकदार आहेत.

सोन्याच्या भावातील घसरणीमुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? किंवा थोडा वेळ थांबा आणि वाट पाहा? यावर तज्ज्ञांनी भिन्न मते आहेत. भावात करेक्शन वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे संचालक सचिन पिंपळे यांनी सांगितले की, बहुतेक कुटुंबांची सोन्यामध्ये गुंतवणूक आहे. सोन्याच्या भावातील घसरण ही धक्कादायक घटना आहे. सोन्याच्या भावात फक्त वाढच होत नाही, असे गुंतवणूकदारांना घसरणीमुळे लक्षात आले. सोन्याचे भाव घसरणार नाहीत, असा समज अनेकांना झाला होता. सोन्याचा इतिहास पाहता सोन्याने चलनवाढीलाही मागे टाकले आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात झालेले हे ‘करेक्शन’ गुंतवणूकदारांना अस्वस्थ करणारे ठरू नये. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी ही वापर आणि गुंतवणूक, या दुहेरी उद्देशाने केली जात असल्यास खरेदीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. सोन्याचा भाव ४० हजार रुपयांवर गेल्यास दागिन्यांची विक्री करणार नाही. त्यामुळे गेल्या सात वर्षांतील तेजीत एकदा ‘करेक्शन’ आल्यावर खरेदीदारांनी घाबरू नये.
गुंतवणुकीतून योग्य ‘रिटर्न’
अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, गुंतवणूकदारांना सोन्यातून अल्पकालावधीत (तीन ते चार वर्षे) नफा कमवायचा असल्यास परिस्थिती वेगळी असू शकते. अल्पकालीन गुंतवणूक करताना अन्य गुंतवणुकीचा विचारही कराला हवा आणि जोखीम आणि नफा व उत्पन्न तपासायला हवे. सोन्यातून चांगले रिटर्न मिळणार असल्याचे गृहित धरल्यास अन्य गुंतवणुकीतून निश्चित रिटर्न मिळेल, अशा गुंतवणुकीच्या पर्यायांची निवड करायला हवी. चार वर्षांचा विचार केल्यास ‘जमा ठेवीत’ ४० टक्के वाढ होईल. त्यामुळे सोन्यामध्ये यापेक्षा अधिक रिटर्न्स मिळतील का हे तपासायला हवे. सोन्याच्या भावात गेल्या दहा वर्षांत तेजी दिसून आली.
गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. त्यामुळे आगामी काळात त्यात चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता कमी आहे. सोने गुंतवणुकीच्या बाबतीत महाग झाले आहे. पुढील काही महिन्यांत रुपयाचे मूल्य महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांत सोने आणि कच्च्या तेलाच्या भावात झालेल्या घसरणीचा फायदा रुपयाला होऊ शकतो. या आर्थिक वर्षांत रुपयाच्या मूल्यात आणखी काही टक्के सुधारणा अपेक्षित आहे. त्याचा प्रभाव देशांतर्गत सोन्याच्या भावावर पडू शकतो. या पाश्वर्भूमीवर सोन्याच्या भावात ‘करेक्शन’ होऊ शकते. सोन्याला २२ आणि २४ हजारांच्या पातळीवर आधार मिळू शकतो. (प्रतिनिधी)