शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
3
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
4
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
5
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
6
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
7
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
8
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
9
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
10
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
11
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
12
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
13
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
14
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
15
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
16
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
17
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
18
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
19
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर माळी यांना सशर्त जामीन

By admin | Updated: June 13, 2014 01:22 IST

अडीच लाखांच्या लाच प्रकरणातील आरोपी सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयाने ५० हजाराच्या रोख

नागपूर : अडीच लाखांच्या लाच प्रकरणातील आरोपी सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयाने ५० हजाराच्या रोख मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
अवस्थीनगर येथील डेव्हलपर व बिल्डर शकीलबाबू वल्द छोटू साहाब यांच्या तक्रारीवरून शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळ्याची कारवाई केली होती.
माळी याच्यावतीने अडीच लाखांची लाच घेताना त्यांचा रायटर मनोहर निमजे याला रंगेहात अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी या दोघांचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला होता. पोलीस कोठडीचा आदेश होऊन माळी यांना न्यायालयाच्या बाहेर आणण्यात आले असता किन्नर आणि विदर्भवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना काळी व निळी शाई फासली होती.
माळी हे पोलीस कोठडी रिमांडमध्ये असतानाच छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून मेडिकल कॉलेज इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतु लोकमतने त्यांच्या व्हीआयपी ट्रीटमेंटचे वृत्त प्रसिद्ध करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीच त्यांना सुटी देऊन टाकली होती.
बुधवारी त्यांना तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची कारागृहाकडे रवानगी केली होती. दरम्यान माळी यांच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.सरकार पक्षाने जामिनास विरोध केला तर बचाव पक्षाने अटींसह जामीन देण्यात यावा, अशी विनंती केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू एकून आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.
शर्तीप्रमाणे त्यांना दोन महिनेपर्यंत सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी द्यावी लागेल. या प्रकरणातील दुसरे आरोपी मनोहर निमजे यांचा मंगळवारीच जामीन झालेला आहे.
माळी यांच्या जामिनाचे ५० हजार रुपये मोनू सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने न्यायालयात भरले. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. कुरेशी, अ‍ॅड. सतीश उके तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)