संगणक प्रशिक्षण संकटात !

By Admin | Updated: June 29, 2014 00:49 IST2014-06-29T00:49:27+5:302014-06-29T00:49:27+5:30

२६ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु संगणक प्रशिक्षणाचे कंत्राट संपल्याने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण संकटात सापडले आहे.

Computer training in trouble! | संगणक प्रशिक्षण संकटात !

संगणक प्रशिक्षण संकटात !

मनपाचा गोंधळ : विद्यार्थी वंचित राहणार
नागपूर : २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु संगणक प्रशिक्षणाचे कंत्राट संपल्याने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण संकटात सापडले आहे.
संगणक प्रशिक्षणाला लवकरच सुरुवात केली जाईल, असा दावा मनपाच्या शिक्षण विभागाकडून केला जात आहे. परंतु नेमके कधी सुरू होणार याबाबत त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही.
मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना संगणक प्र्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु संगणक प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा नसल्याने मनपाने मुंबईच्या कम्प्युटर बिझनेस मॅनेजमेंट व चेन्नई येथील एवरोन क ंपनीसोबत संगणक प्रशिक्षण देण्याचा करार केला. या कराराची मुदत संपल्याने प्रशिक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मनपा जुन्याच कंत्राटदारांसोबत करार करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.
परंतु तोवर विद्यार्थ्याना संगणक प्रशिक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Computer training in trouble!