शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्सच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: February 11, 2016 03:29 IST

दोन लाख रुपये आणि त्यावरील दागिने खरेदीवर पॅनकार्ड दाखविणे सक्तीचे केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध ...

नागपूर : दोन लाख रुपये आणि त्यावरील दागिने खरेदीवर पॅनकार्ड दाखविणे सक्तीचे केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध बुधवारी जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी आणि सोना चांदी ओळ कमेटीने पुकारलेल्या एक दिवसीय बंदला एका गटाने विरोध केल्याने संमिश्र प्रतिसाद मिळाला. या संदर्भात कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.कमेटीच्या सदस्यांमध्ये फूटमोठ्या शोरूम पूर्णत: बंदकमेटीच्या बंदच्या निर्णयाला काही ज्वेलर्सने विरोध करीत दुकाने सुरू ठेवली. यामुळे कमेटीचे पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. पण वामन हरी पेठे, बटुकभाई, दास ज्वेलर्स, करण कोठारी ज्वेलर्स, तनिष्क, टीबीझेड, आसरे ज्वेलर्स आदींसह शहरांतील सर्व ब्रॅण्डेड आणि स्थानिकांच्या मोठ्या शोरूम बंद होत्या. इतवारी भागातील ज्वेलर्सची दुकाने सुरू असली तरीही वृत्तपत्रांमधील बंदच्या बातम्यांमुळे ग्राहक बाजारात फिरकला नाही. सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. बाजारात अनेकविध चर्चेला ऊत आला होता. विरोधी गटाने एकत्रितरीत्या ज्वेलर्सला दुकाने सुरू करण्यास भाग पाडल्याची चर्चा होती. काही ज्वेलर्सने दुपारी १ पर्यंत दुकाने बंद ठेवली होती. पण बाजूचे सुरू असल्याचे पाहून आम्हाही दुकान सुरू केल्याचे व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ग्रामीण भागात ज्वेलर्सची दुकाने बंद होती. २० टक्के लोकांकडे पॅन कार्डनागपूर जिल्ह्यातील ज्वेलर्सची प्रमुख संघटना सोना चांदी ओळ कमेटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले की, कमेटीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण जिल्ह्यातील ब्रॅण्डेड आणि मोठ्या शोरूम पूर्णत: बंद होत्या. आता तर दोन लाखांच्या खरेदीवर सरकार पॅन कार्ड मागत आहे. पुढे ही अट ५० हजारांवर येण्याची शक्यता आहे. अर्थात ५० हजाराचे सोने खरेदी करणाऱ्यांना कराच्या टप्प्यात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात केवळ २० टक्के लोकांकडे पॅन कार्ड आहेत. आधार कार्डप्रमाणे किंवा किमान ५० टक्के लोकांना पॅन कार्डचे वाटप केल्यानंतरच सरकारने उपरोक्त धोरणाची अंमलबजावणी करावी. बंद आंदोलनासाठी अशोक वस्तानी, राजेंद्र सेठ, प्रदीप कोठारी, राजेश रोकडे, अनुप उदापुरे, श्रीकांत भांडारकर आदींसह अन्य ज्वेलर्सने परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)