अज्ञात वाहनाची धडक, ८२ वर्षाच्या वृद्धाचा अंत
By दयानंद पाईकराव | Updated: May 25, 2024 17:36 IST2024-05-25T17:35:50+5:302024-05-25T17:36:30+5:30
Nagpur : अपघातानंतर वाहनचालक तेथून फरार

Collision with unknown vehicle, 82-year-old man dies
नागपूर : अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ८२ वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी २२ मे रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. पुरुषोत्तम पांडुरंग पुट्टेवार (८२, रा. शुभनगर, मानेवाडा रोड, अजनी) हे शिवमंदिर मानेवाडा रोडकडून बालाजीनगरकडे जाणाºया रस्त्यावर दिनदयाल उपाध्याय लायब्ररी समोरून जात होते.
तेवढ्यात मागून येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक तेथून पळून गेला. पुरुषोत्तम यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मनिष पुरुषोत्तम पुट्टेवार (५६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.