दोन ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 10:52 PM2019-12-07T22:52:25+5:302019-12-07T22:53:02+5:30

जामठा शिवारात हिंगणा बायपास रोडवर दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत एका ट्रकमधील दोन चालकांचा मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला.

The collision of two trucks, the death of two | दोन ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू

दोन ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील हिंगणा बायपास रोडवरील घटना : क्लीनर गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (हिंगणा) : जामठा शिवारात हिंगणा बायपास रोडवर दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत एका ट्रकमधील दोन चालकांचा मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडला.
पुरुषोत्तम ब्रजलाल चंद्रवंशी (३२), पूरण शिवलाल यादव (२९), अशी मृत चालकांची नावे आहेत. रामदयाल यादव (वय ३४) असे जखमी क्लीनरचे नाव आहे. त्याच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही जि. राजनांदगाव, छत्तीसगड येथील राहणारे आहेत. हे तिघेही ट्रक क्रमांक सी.जी. ०७/ए.एक्स.६३१३ ने पांजरी टोलनाका येथून हिंगणा वळणमार्गाने अमरावती महामार्गाकडे जात होते. पुरुषोत्तम हा ट्रक चालवीत होता तर दोघे केबिनमध्ये त्याच्या शेजारी बसले होते. जामठा शिवारात कॅन्सर हॉस्पिटलसमोर असलेल्या डिव्हायडरलगत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.पी.२०/ एच. बी ५३३८ च्या चालकाने अचानक ‘यू टर्न’ घेत रोडच्या दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दोन्ही ट्रकची धडक झाली. या अपघातात ट्रक क्रमांक सी.जी. ०७/ए.एक्स. ६३१३ मधील पूरण याचा जागीच मृत्यू झाला तर पुरुषोत्तम व रामदयाल हे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. हिंगणा पोलिसांना माहिती मिळताच हवालदार विनोद देशमुख व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना उचलून पोलिसांनी त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान पुरुषोत्तम चंद्रवंशी याचा मृत्यू झाला. दुसऱ्या ट्रकचा चालक हा फरार असून, हिंगणा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात विनोद देशमुख करीत आहेत.

Web Title: The collision of two trucks, the death of two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.